<
माननीय पंतप्रधानमंत्री च्या प्रेरणेने आणि मार्गदर्शनाखाली, भारतीय स्वातंत्र्य दिनाचा अमृत महोत्सव- स्वातंत्र्याचा ७५ वा वर्धापन दिनानिमित्त आपल्या लोकांचा, संस्कृतीचा आणि कर्तृत्वाचा गौरवशाली इतिहास साजरा करत आहोत. माननीय पंतप्रधान मंत्री श्री नरेंद्र मोदी यांनीही त्यांच्या स्वातंत्र्यदिनाच्या भाषणात पंच प्राण मंत्र ची घोषणा केली होती. “अमृत कालच्या काळातील भारत @ 2047 ची झलक” या संदर्भात, युवा कार्यक्रम आणि क्रीडा मंत्रालय आणि त्यांची स्वायत्त संस्था नेहरू युवा केंद्र संघटन (NYKS) 1 एप्रिल ते 31 मे 2023 या कालावधीत देशभरातील सर्व जिल्ह्यांमध्ये समुदाय आधारित संस्था (CBO) मार्फत “युवा संवाद – भारत @ 2047” या कार्यक्रमाचे आयोजन करत आहे.
जिल्ह्याच्या विविध CBOs (समुदाय आधारित संस्था) च्या मदतीने आणि सहाय्याने जिल्हा स्तरावर कार्यक्रम आयोजित करण्याची योजना आहे. जे पंच प्राण अनुरूप देश च्या भविष्य आणि सकारात्मक संवाद निर्माण करण्यासाठी, एन.वाय.के. जळगाव सोबत हात मिळवणी करतील, अशी माननीय पंतप्रधान यांची संकल्पना होती.
हा कार्यक्रम टाऊन हॉल स्वरूपात आयोजित केला जाईल, ज्यामध्ये तज्ञ/जाणकार व्यक्ती असतील. जे पंच प्राण वर चर्चा करतील आणि त्यानंतर किमान ५०० तरुणांच्या सहभागासह प्रश्नोत्तरे एक सत्र होईल. आयोजक CBO ला कार्यक्रम आयोजित करण्यासाठी रु.20,000/- पर्यंत प्रतिपूर्ती केली जाईल. ज्या CBOs अर्ज करू इच्छितात त्यांचा गैर-राजकीय, पक्षपाती नसलेला इतिहास असणे आवश्यक आहे आणि युवा संवाद कार्यक्रम आयोजित करण्यासाठी पुरेसे संघटनात्मक बळ असायला हवे. संस्था विरुद्ध कोणताही फौजदारी खटला प्रलंबित नसावा. कार्यक्रम आयोजित करण्यासाठी जिल्हयातील जास्तीत जास्त 3 सीबीओ निवडले जातील.
निकष पूर्ण करणारे इच्छुक CBOs, नेहरू युवा केंद्र जळगाव (महाराष्ट्र) पत्ता- गट क्रमांक 40, प्लॉट क्रमांक 60, द्रौपदी नगर, जळगाव, पिन 425001 येथून प्राप्त विहित अर्जामध्ये अर्ज सादर करू शकतात. अर्ज करण्याची अंतिम तारीख 20 मार्च 2023 आहे. अधिक माहितीसाठी एन.वाय.के. जळगाव (महाराष्ट्र) येथे संपर्क साधा. किंवा [email protected] वर ईमेल लिहा किंवा 0257-2951754 वर संपर्क साधा. अर्ज डाउनलोड करण्यासाठी लिंक https://drive.google.com/file/d/1T9Wb3IGF0Vfa2AO795kwTYLakIcP2MX4/view?usp=sharing आहे.