<
फैजपूर: धनाजी नाना महाविद्यालय फैजपुर च्या IQAC विभाग द्वारा नुकतेच लैंगीक स्वास्थ आणि आहार जनजाग्रूती या विषयावर व्याख्यान आयोजीत करण्यात आले. प्रसंगी उपप्राचार्य डॉ.उदय जगताप यांनी उपस्थितांना मार्गदर्शन करत असताना सांगितले की क्रुत्रिम एवजी नैसर्गिक अन्न घटकांचा समावेश दैनंदीन आहारात करावा तसेच युवकांनी व सर्वच नागरिकांनी मादक द्रव्य व इतर व्यसनांकडे न वळता स्वताला व्यायामाचे व्यसन लाऊन घ्यावे त्याने सारखे सारखे होणारे आजार टळतील आणि पर्यायाने आर्थिक आणि मानसिक आधार मिळेल. म्हणुन प्रत्यकाने स्वतः च्या शरीराचे संवर्धन करा असा मोलाचा सल्ला उपस्थित विद्यार्थी विद्यार्थिनींना दिला. प्रमुख वक्त्या प्रा. डॉ. राजश्री पी. नेमाडे यांनी स्त्री आणि पुरुष यांच्यामधील संप्रेरके आणि त्यांचा शरीरावर होणारा परीणाम तसेच त्यांच्यातील विविध लैंगीक आजारांविषयी सविस्तर माहिती देऊन मोलाचे मार्गदर्शन केले.
कार्यक्रमासाठी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.पी.आर.चौधरी यांचे विशेष मार्गदर्शन लाभले तसेच प्रा.डॉ. कल्पना पाटील, प्रा. डॉ. जयश्री पाटील, प्रा. डॉ. सीमा बारी, प्रा. डॉ. पल्लवी भंगाळे यांचे सहकार्य लाभले.
कार्यक्रमाचे प्रस्ताविक प्रा.डॉ.टी.एम. सावसाकडे यांनी केले तर सूत्र संचलन प्रा.शुभांगी पाटील यांनी व आभार प्रा. डॉ.सविता वाघमारे यांनी मानले.