<
जळगाव – (प्रतिनिधी) – मू. जे. महाविद्यालयातील भूगोल विभागात भू-सर्वेक्षण या विषयावर एक दिवसीय कार्यशाळा आयोजित करण्यात आली. सदर कार्यशाळेसाठी अहमदनगर महाविद्यालय, अहमदनगर येथील भूगोल विभागात सहयोगी प्राध्यापक म्हणून कार्यरत असलेले डॉ. महादेव जाधव हे तज्ञ वक्ता म्हणून उपस्थित होते. त्यांनी भू-सर्वेक्षणातील थेडोलाईट व डम्पी-लेवल या यंत्रांचे महत्व व त्यांचा वापर यावर मार्गदर्शन केले. तसेच सर्वेक्षण कार्यातील रोजगारासाठी उपलब्ध असलेल्या निरनिराळ्या संधी व कला शाखेतील विद्यार्थ्यांसाठी उपलब्ध विशेष रोजगाराच्या संधी या विषयावर प्रमुख व्याख्यान दिले. या कार्यक्रमासाठी विज्ञान व कला शाखेतील विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
सदर कार्यक्रमासाठी मू. जे. महाविद्यालयाचे प्राचार्य तसेच भूगोल विभागाचे विभागप्रमुख प्रा. डॉ. संजय भारंबे, भूगोल विभागातील प्राध्यापक डॉ. चेतन महाजन, प्रा. सागर डोंगरे, डॉ. सहदेव जाधव, डॉ. गुलाब तडवी व प्रा. अविनाश साळुंखे तसेच विभागातील शिक्षकेत्तर कर्मचारी गणेश सोनार यांनी सहकार्य केले.