<
यावल – (प्रतिनिधी) – यावल पुर्व वनपरिक्षेत्र कार्यालय यावल येथे यावल, रावेर तालुक्यातील प्रादेशिक क्षेत्रातील यावल वनविभाग जळगांव चे सातपुडा जंगलातील झाडांची चोरटी तोड , अवैध अतिक्रमण रोखण्यासाठी , तसेच वन वणवा रोखण्यासाठी आणि लागलेला वनवा विझविण्यासाठी 90 वन मजुरांचे पथके तयार करण्यात आलेले आहेत.
सदरचे पथके हे मौजे मनुदेवी, वाघझिरा, आंबापाणी,निंबादेवी, नागादेवी, जामुनझिरा, हरिपुरा, आसराबारी, चारमळी,रुईखेडा, मोहमांडली, तिड्या, अंधारमळी, डोंगरदे, जानोरी, निमड्या,गारखेडा, पाल, गारबर्डी, मोहरव्हाल, जिन्सी, पाडल्या बु, लालमाती, सहस्रलिंग, कुसुंबा, लोहरा, चिचाटी असे वेगवेगळे ठिकाणी नियमित जंगल गस्ती कामी वन कर्मचारी यांचे पथके तैनात करण्यात आलेले आहे.
जंगलात आग लावणारे गुन्हेगार पकडणारे, शोधुन आणणारे, त्याबाबत माहिती देणारे यांना वनविभाग कडून 10000/- ( दहा हजार) रुपये रक्कम गुपीत इनाम दिला जाणार आहे. वन वणव्यामुळे जंगलाचे मोठे नुकसान होते. त्यामुळे जंगलात व जंगलाचे शेजारी राहत असलेले सर्व जनतेला आवाहन करण्यात येते की जंगलात आग लावू नका, आग लागलेली दिसल्यास व आगीची माहिती मिळाल्यास तात्काळ वन कर्मचारी यांना कळवा अथवा टोल फ्री नं 1926 वर संपर्क करावे तसेच वनवा विझविण्यासाठी वन कर्मचारी यांना सहकार्य करावे. जर जंगलात आगी लावण्याचे थांबले नाही तर जंगलाचे होणारे नुकसान पहाता जंगलातून डिंक, इतर वनोपज गोळा करण्यासाठी ग्रामपंचायतींना दिलेला परवाना रद्द करण्यात येईल असे यावल वनविभागाचे उपवनसंरक्षक मा.श्री.जमीर शेख यांनी आवाहन केले. तसेच वनगुन्हेगारांची हयगय केली जाणार नाही त्यांच्यावर कायदेशीर कडक कारवाई करण्यात येईल असे सांगितले.
या कार्यक्रमात सदरील वन कर्मचारी यांना वनविभागाचे टी शर्ट, पॅन्ट, टोपी, शुज, पाणी बोटल असे साहित्याचे वाटप करण्यात आले. सदरचा कार्यक्रम मा. श्री. डिगंबर पगार वनसंरक्षक धुळे यांचे मार्गदर्शनाने घेण्यात आला.या कार्यक्रमात मा.श्री.जमीर शेख उपवनसंरक्षक यावल वनविभाग जळगांव, मा. श्री. प्रथमेश हडपे सहाय्यक वनसंरक्षक यावल, श्री. विक्रम पदमोर वनपरिक्षेत्र अधिकारी यावल पुर्व, श्री. सुनील भिलावे वनपरिक्षेत्र अधिकारी यावल पश्चिम, श्री. अजय बावणे वनपरिक्षेत्र अधिकारी रावेर, श्री. रविंद्र तायडे वनपाल डोंगरकठोरा,वनरक्षक श्री. प्रकाश बारेला, श्री. भैय्यासाहेब गायकवाड यांचे उपस्थितीत कार्यक्रम झाला.या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री. विक्रम पदमोर वनपरिक्षेत्र अधिकारी यावल पुर्व यांनी केले.