समाजसेवक सुमित पंडित यांनी जेष्ठ नागरिकांना लोहारा येथे केले आवाहन
लोहारा ता.पाचोरा जि. जळगाव (रिपोर्टर ईश्वर खरे)-लोहारा तालुका पाचोरा येथे ज्येष्ठ नागरिक संघ यांच्या वतीने दर रविवारी संध्याकाळी ०४ ते ०५ या वेळेत सामाजिक क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या व्यक्तींचा मार्गदर्शन व्याख्यान आयोजित केले जातात.यामध्ये दिनांक १९/०३/२०२३,रविवार रोजी महाराष्ट्रात तरुण समाजसेवक ओळख असलेल्या व गरिबांचा सिंघम सुमित पंडित यांचे व्याख्यान पार पडले.
कार्यक्रमाची सुरुवात ‘खरा तो एकची धर्म,जगाला प्रेम अर्पावे, या प्रार्थनेने झाली.
गजानन क्षिरसागर माणुसकी समुह जळगाव जील्हा अध्यक्ष यांनी सु-लक्ष्मी सेवाभावी संस्था व माणुसकी रुग्णसेवा समूह करीत असलेल्या कार्याबद्दल ज्येष्ठ नागरिकांना माहिती दिली.उपस्थितांना मार्गदर्शन पर याख्यांनातुन बोलताना म्हणाले कि तुम्ही आता चिंता करू नका,चिंतन करा आणि मनसोक्त जीवनाचा आनंद घ्या असा सल्लाही दिला. मी चे रूपांतरण आम्ही मध्ये करा,जीवन जगत असताना दुसऱ्याला मदत करणे हे माणसाचे आद्यकर्तव्य आहे असे सांगितले. मनोरुग्नसेवा,आरोग्य सेवा, बेवारस अंत्यविधी, सर्व उपक्रमांची माहिती दिली.
तसेच समाजसेवक गजानन क्षीरसागर यांनीही जळगाव जिल्ह्यात सुरू असलेल्या माणुसकी समूहाच्या कार्याची माहिती दिली.
माणुसकी समूहाचे कार्य हे सर्व सामान्य लोकांच्या मदतीच्या स्वरूपातून चालू आहे त्याला हातभार म्हणून ज्येष्ठ नागरिक संघ देखील माणुसकी समूहाच्या कार्याला मदत करणार असल्याचे ज्येष्ठ नागरिक संघाचे अध्यक्ष भास्कर अंबिकार यांनी सांगितले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन ज्येष्ठ नागरिक संघाचे अध्यक्ष भास्कर अंबिकार यांनी केले. कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन ज्येष्ठ नागरिक डब्ल्यू एस पाटील यांनी केले. कार्यक्रमाची सांगता पसायदानाने झाली. कार्यक्रम यशस्वीतेसाठी सर्व ज्येष्ठ नागरिकांनी परिश्रम घेतले.