
:- धरती चौधरी
सकाळ यीन जिल्हास्तरीय खान्देश विभाग अधिवेशन कालच संपन्न झाले.यावेळी प्रमुख अतिथी राजू भोळे आमदार जळगाव, मा.मनोज गोविंदवार स्टेटजी मेकर युथ मेंटार महाराष्ट्र, मा.केतकी पाटील गोदावरी फाउंडेशन सदस्या, महाविद्यालयाचे प्राचार्य विजय पाटील ,मा. सचिन जोशी सकाळ संपादक , यिन खानदेश प्रमुख वैभव कुशारे तसेच कबचौ उमवी jalgaon,uict प्रमुख मयूर साळवे आणि इतर महाविद्यालयातील यिन अध्यक्ष उपाध्यक्ष, सचिव सहसचिव , पदाधिकारी उपस्थित होते .
विद्यार्थ्यांशी/पदाधिकाऱ्यांशी संवाद साधतांना राजू भोळे ह्यांनी सांगितले तुमची समस्या मांडण्यासाठी थेट माझ्याशी संपर्क करा मी त्याचे निराकरण करण्याचा प्रयत्न करेन
तसेच मनोज गोविंदवार ह्यांनी तुम्ही जी गोष्ट वापरत नाही ती गळून पडते .तुम्हाला ज्यात एक्सपर्ट व्हायचं आहे त्याचे तुम्ही आधी शिक्षक व्हायला हवेत. वाचन , सातत्य आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे धाडस हे यशस्वी होण्याचे सूत्र आहेत आपण सवतःला असामान्य समजावे असा संदेश तरुणांना दिला.