<
अवघ्या १३ वर्षांच्या मुलीचा मृत्यू झाल्याची घटना हैदराबादमध्ये घडली आहे. रात्री अचानक मुलीला श्वास घेण्यास त्रास सुरू झाला. तिला रुग्णालयात दाखल करण्याच्या हालचाली सुरू होत्य
हैदराबाद: गेल्या काही महिन्यांपासून हृदय विकारामुळे होणाऱ्या मृत्यूंची संख्या वाढली आहे. करोना संकटानंतर हदय विकाराच्या झटक्यांचं प्रमाण वाढल्याचं निरीक्षण नोंदवण्यात आलं आहे. करोना संकटकाळात शरीरात अनेक महत्त्वाचे बदल झाले. त्यामुळेच हृदय विकाराच्या घटनांचं प्रमाण वाढल्याचं तज्ज्ञ सांगतात. हैदराबादच्या महबूबाबादमधील मारीपेडा येथील अब्बेपलेम गावात एका १३ वर्षीय मुलीचा हृदय विकाराच्या झटक्यानं मृत्यू झाला आहे. त्यामुळे गावावर शोककळा पसरली आहे.
बोडा श्रावंती नावाच्या मुलीचा हृदय विकाराच्या झटक्यानं मृत्यू झाला. ती इयत्ता सहावीत शिकत होती. गुरुवारी (३० मार्च) रात्रीच्या सुमारास त्याला श्वास घेण्यात अडचण येऊ लागली. कुटुंबीयांनी सुरुवातीला तिच्याकडे फारसं लक्ष दिलं नाही. मात्र थोड्याच वेळात तिची प्रकृती आणखी बिघडली. त्यामुळे कुटुंबीय तिला डॉक्टरांकडे घेऊन जाऊ लागले. मात्र त्याआधीच बोडा अचानक कोसळली. तिचा जागीच मृत्यू झाला. बोडा तिच्या आजी आजोबांकडे राहत होती.गुरुवारी रात्री मुलगी कुटुंबीयांसोबत झोपली. बाराच्या सुमारास ती झोपेतून अचानक उठली. श्वास घेण्यात अडचण येत असल्याचं तिनं आजीला सांगितलं. छातीत दुखत असल्याचंही बोडा म्हणाली. तिला होणारा त्रास वाढू लागताच कुटुंबीय रिक्षा आणण्यास गेले. मात्र रिक्षा येण्यापूर्वीच मुलीचा मृत्यू झाला. मुलीच्या काकांनी तिला सीपीआर देण्याचा प्रयत्न केला. मात्र त्याचा कोणताच उपयोग झाला नाही. बोडाच्या अकाली निधनानं कुटुंबाला धक्का बसला आहे. तिला श्वासाचा कोणताच आजार नव्हता. ती पूर्णत: तंदुरुस्त होती असं तिच्या कुटुंबीयांनी सांगितलं.
Chest Pain and Heart Attack difference | Chest Pain आणि Heart Attack मधील फरक काय | Maharashtra Times
गेल्या काही महिनांपासून हृदय विकारामुळे होणाऱ्या मृत्यूच्या घटना वाढल्या आहेत. हृदय विकाराचा झटका, हृदय क्रिया बंद पडल्यामुळे अनेक जण चालता बोलता जीव सोडत आहेत. लग्नात नाचताना, रंगमंचावर कला सादर करताना, जिममध्ये व्यायाम करताना अनेकांनी जीव गमावला आहे. या घटनांमध्ये वाढ झाल्यानं चिंता व्यक्त होत आहे.