Friday, June 9, 2023
सत्यमेव जयते
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
सत्यमेव जयते
No Result
View All Result

भाजपा – शिवसेनेतर्फे ३० मार्च पासून राज्यव्यापी सावरकर गौरव यात्रा भाजपा जिल्हाध्यक्ष आ. सुरेश भोळे (राजूमामा) यांची माहिती

टिम-सत्यमेव जयते by टिम-सत्यमेव जयते
04/04/2023
in जळगाव, राजकारण
Reading Time: 1 min read
भाजपा – शिवसेनेतर्फे ३० मार्च पासून राज्यव्यापी सावरकर गौरव यात्रा भाजपा जिल्हाध्यक्ष आ. सुरेश भोळे (राजूमामा) यांची माहिती

जळगाव – (प्रतिनिधी) – स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या स्वातंत्र्य लढ्यातील कामगिरीचे स्मरण करून देण्यासाठी राज्यभरात ३० मार्च पासून भारतीय जनता पार्टी आणि शिवसेने तर्फे सावरकर गौरव यात्रा काढण्यात येत आहे. अशी माहिती भाजपा आ.सुरेश भोळे (राजूमामा) यांनी दिली. ही यात्रा ६ एप्रिल पर्यंत चालणार आहे. नव्या पिढीला स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या कार्याची ओळख करून देण्यात येणार आहे, असेही ते म्हणाले.

राहुल गांधी व काँग्रेस च्या अन्य नेत्यांकडून सावरकरांचा वारंवार अवमान केला जात आहे. सावरकरांचा अपमान करणाऱ्या काँग्रेसबरोबरची युती उद्धव ठाकरे यांनी तोडून दाखवावीच, असे आव्हानही आ. सुरेश भोळे (राजूमामा) यांनी दिले.

https://satymevjayate.com/wp-content/uploads/2021/07/Kantai_-Netralaya_AD.mp4

राज्यातील सर्व २८८ विधानसभा मतदारसंघांतून सावरकर गौरव यात्रा प्रवास करेल. ६ एप्रिल रोजी भारतीय जनता पार्टीच्या स्थापना दिनी या यात्रेचा समारोप होणार आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, प्रदेशाध्यक्ष आ. चंद्रशेखर बावनकुळे तसेच भाजपा – शिवसेनेचे सर्व लोकप्रतिनिधी, पदाधिकारी या यात्रेत सहभागी होणार आहेत.

उद्धव ठाकरे यांनी काँग्रेसकडून स्वातंत्र्यवीर सावरकरांचा वारंवार होणारा अपमान सत्ता टिकवण्यासाठी निमूटपणे सहन केला. सत्तेसाठी उद्धव ठाकरेंनी हिंदुत्वाचा विचार सोडून दिला. बाळासाहेब ठाकरे यांनी सावरकरांचा अपमान करणाऱ्या मणिशंकर अय्यर यांच्या प्रतिमेला रस्त्यावर उतरून जोडे मारले होते. तशी हिंमत उद्धव ठाकरेंनी दाखवायला हवी होती, असेही आ. सुरेश भोळे(राजूमामा) यांनी नमूद केले.

या यात्रेसाठी प्रदेश संयोजक म्हणून प्रदेश महामंत्री श्री. विक्रांत पाटील, मुंबई सरचिटणीस श्री.संजय उपाध्याय तसेच उत्तर महाराष्ट्र • महाराष्ट्र राज्याचे ग्रामविकास मंत्री मा. ना. गिरीषभाऊ महाजन, आ.जयकुमार रावल, प्रदेश महामंत्री श्री. विजय चौधरी, जिल्हाध्यक्ष आ. सुरेश भोळे(राजूमामा), श्री. दिपक सुर्यवंशी, खा. रक्षाताई खडसे, खा. उन्मेषदादा पाटील, आ. संजय सावकारे, आ.मंगेश चव्हाण, श्री.पी.सी. आबा पाटील, श्री. नंदू महाजन, प्रल्हाद पाटील, श्री.के.बी.पाटील, श्री. राकेश पाटील, श्री. सचीन पानपाटील, श्री. हर्षल पाटील, श्री. मधुकर काटे, श्री विशाल त्रिपाठी, डॉ.राधेश्याम चौधरी, श्री. महेश जोशी, श्री. नितीन इंगळे, श्री. राहुल वाघ, श्री. जयेश भावसार, श्री.श्रीकांत महाजन, श्री. आनंद सपकाळे यांच्या उपस्थितीत होणार आहे.

गेल्या काही वर्षांपासून हिंदुत्व हा विषय देशाच्या एकूण राजकारणाचा केंद्रबिंदू झाला असल्याने प्रखर हिंदुत्व मांडणारे स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांना सतत अपमानित करण्याचा प्रयत्न काँग्रेस पक्षाकडून होत आहे. अंदमानातील काळ्यापाण्याची शिक्षा भोगत असताना सावरकरांनी इंग्रजांना पत्र लिहून त्यांची माफी मागितली असे घाणेरडे आरोप करून सावरकरांना माफी वीर म्हणून बदनाम केले जात आहे, परंतु अशा फुटकळ आरोपांनी सावरकरांचे बहुआयामी व्यक्तिमत्व डागाळले जाणार नाही. सावरकर म्हणजे सूर्य त्याचे तेज तळपत राहणारच. स्वा. सावरकर साहित्याचे अभ्यासक व्याख्याते आणि सावरकर अध्यासनाचे संचालक डॉ. लक्ष्मीकांत बाहेगव्हाणकर यांनी सावरकरांवर होत असलेल्या आरोपांना दिलेले सडेतोड उत्तर दिले आहे.

सावरकरांवर पहिला आरोप केला जातो तो म्हणजे अंदमानत काळ्यापाण्याची शिक्षा भोगत असताना सावरकरांनी जेलमधून सुटका व्हावी म्हणून ब्रिटिश सरकारची माफी मागितली. मात्र हा आरोप साफ चुकीचा आणि सावरकरांची बदनामी करणारा आहे. सावरकरांना १९१० साली काळया पाण्याची जन्मठेपेची शिक्षा झाली. शिक्षेनंतर त्यांच्या घरावर जप्ती आली. सर्व संपत्ती जप्त करण्यात आली, एवढेच काय पण सावरकरांचा चष्मा ही जप्त करण्यात आला. माझी पन्नास वर्षांची शिक्षा एकत्र समजावी असा विनंती अर्ज सावरकरांनी केला.

ब्रिटिशांनी फेटाळून लावत २५ वर्षांची एक शिक्षा पूर्ण झाल्यानंतर पुन्हा २५ वर्षांची शिक्षा भोगावी लागल्यामुळे ते अंदमानात गेल्यानंतर सावरकरांनी पहिले आवेदन ३० सप्टेंबर १९९९ रोजी केले. त्यानंतर १९१२, १९१३, १९१४, १९१७, १९२० (तीन वेळा) १९२३ (दोन वेळा) अशी दहा आवेदने पाठवल्याच्या नोंदी आहेत. ही निवेदने आजही समग्र सावरकर वाङ्मयात प्रकाशित करण्यात आलेली आहेत. ही पत्रे पाठवण्यामागे सावरकरांची कुटनिती होती. क्रांतिकार्य करत असताना क्रांतिकारकांनी अकारण प्राण त्याग करू नये. मोठी झेप घेण्यासाठी प्रसंगी चार पावले माघार घ्यावी हा सावरकरांचा दृष्टिकोन होता. अंदमानात कारावासात खितपत पडून भारतीय स्वातंत्र्य लढ्यात सहभाग कसा घेता येईल त्यासाठी शत्रूला फसवून कारागृहाबाहेर येणे व संधी मिळताच पुन्हा स्वातंत्र्य लढ्यात भाग घेणे असा हेतू सावरकरांचा होता. सावरकर स्वतःसाठी नव्हे अंदमानातील सर्व राजबंदीवानांना राजक्षमेचा लाभ मिळावा ही सामूहिक मागणी करत होते. फक्त मला सोडा अशी त्यांची स्वार्थी मागणी नव्हती. १९९८ च्या पत्रात सावरकर लिहितात राजकीय गुन्ह्यासाठी दोषी असलेल्या सर्व व्यक्तींना सर्वसामान्यपणे क्षमा दिली जावी. अंदमानातून सावरकरांनी सरकार कडे जेवढी आवेदन पत्रे केली तेवढी आवेदन पत्रे फेटाळून लावण्यात आली हे महत्त्वाचे आहे. इंग्रज सरकारने त्यांची कोणतीही मागणी मान्य केलेली नाही.

सावरकरांच्या समकालीन शिक्षा झालेल्या क्रांतिकारकांनी सरकारशी जो पत्रव्यवहार केलेला आहे या पत्र व्यवहारांमध्ये पत्राच्या शेवटी सही करतानाय “your most obidient servent” असे लिहिण्याची पद्धत प्रचलित होती. तो एक पत्राचा फॉरमॅट होता. पत्र लिहिण्याची ती परिभाषा होती याचा अर्थ कुणी असा काढत असेल सावरकरांनी ब्रिटिशांना मी तुमचा अज्ञाधारक गुलाम आहे तर अशा लोकांच्या बुद्धीची किव येते. १९२१ मध्ये सावरकरांना अंदमानातून सोडण्याचा निर्णय घेण्यात आला तो त्यांच्यावर कृपादृष्टी म्हणून नव्हे तर अंदमानची वसाहत बंद करून टाकण्याचा अहवाल कारागृह मंडलाने १९२० मध्ये दिला होता. त्यामुळे सावरकर बंधूंची अंदमानातून सुटका झाली परंतु जेलमधून सुटका झाली नाही. सावरकर अंदमानतून भारतात आल्यानंतर त्यांना कलकत्ता येथील अलीपुर कारागृहामध्ये आठ दिवस ठेवण्यात आले होते. त्यानंतर पुण्यातील येरवडा कारागृहात आणि पुढे सहा जानेवारी १९२४ रोजी दोन अटींवर त्यांची तुरुंगातून मुक्तता केली. १) पाच वर्षापर्यंत प्रकटपणे वा अप्रकट पणे राजकारणात भाग घ्यायचा नाही. २) शासनाच्या आदेशा शिवाय रत्नागिरी जिल्ह्याच्या सीमेबाहेर जायचे नाही. सावरकर तुरुंगातून मुक्तता झाली पण संपूर्ण मुक्तता नव्हती गुप्तचारांचा पहारा, अपुरी संपर्क साधने खालावलेली आर्थिक परिस्थिती अशा अवस्थेत सावरकर रतनागिरी मध्ये १९३७ पर्यंत स्थानबद्ध होते. सावरकरांनी ब्रिटिशांना जेवढी पत्र लिहिली त्या पाठीमागील राजकीय खेळी भूमिका सावरकरांनी कधीही लपून ठेवलेली नाही, त्यांचे आत्मचरित्र “माझी जन्मठेप” मध्ये या सर्वांचा तपशीलवार उल्लेख केलेला आहे. त्यामुळे हा आरोप साफ खोटा आणि अभ्यास न करता केलेला आहे.

सावरकरांवर दुसरा आरोप खासदार राहुल गांधी यांनी केला आहे तो म्हणजे त्यांना साठ रुपये महिना ब्रिटिश सरकारची पेन्शन मिळत होती. हा आरोप ही अत्यंत चुकीचा आहे. यासाठी सावरकरांची त्या काळातील आर्थिक स्थिती समजून घेणे आवश्यक आहे क्रांतिकार्य केल्यामुळे सावरकरांची बॅरिस्टरची पदवी काढून घेतली होती. ब्रिटिशांची एकनिष्ठ राहा असे मान्य केले तरच बॅरिस्टरची पदवी मिळेल असे सावरकरांना सांगण्यात आले होते. शिक्षण घेतले तरी पदवी नसल्यामुळे वकिली व्यवसाय करता येत नव्हता. रत्नागिरी सारख्या त्यांच्यासाठी नवीन असलेल्या भागांमध्ये नोकरी व्यवसाय करणे ही अवघड होते. ब्रिटिशांची याला अनुमती ही नव्हती. रत्नागिरीमध्ये स्थानबद्ध असताना घरात पत्नी, दोन मुले, यांचे पालन पोषण गरजेचे होते.

भगूर येथील मालमत्ता गहाण पडलेली होती. दुसरे मिळकतीचे मार्ग बंद झाले होते. त्यामुळे १९२९ ला जेव्हा सावरकरांची शिक्षा आणखी दोन वर्षासाठी वाढवण्यात आली. तेव्हा त्यांनी ब्रिटिश सरकारकडे किमान शंभर रुपये निर्वाह भत्ता द्यावा असा अर्ज केला होता. त्या वेळेचे ग्रह सचिव फॅन्ड्री नाईट यांनी असा बत्ता मंजूर करता येणार नाही, सावरकरांनी खुशाल जेलमध्ये जावे असे सांगितले असा शेरा दिला परंतु सरकारने सावरकरांच्या आर्थिक स्थितीची माहिती मागवली. त्यावेळेसचे रत्नागिरीचे जिल्हाधिकारी यांनी सावरकरांना १५० रुपये निर्वाह भत्ता द्यावा अशी शिफारस केली होती.

एक ऑगस्ट १९२९ पासून सावरकरांना दरमहा साठ रुपये निर्वाह भत्ता देण्यास सुरुवात केली होती. निर्वाह भत्ता मिळणारे सावरकर हे एकमेव क्रांतीकारक नव्हते. इंग्रज सरकारने अनेकांना अशा स्वरूपाचे निर्वाहभत्ते दिलेले आहेत. म्हणजे सावरकरांवर विशेष कृपादृष्टी म्हणून त्यांना निर्वाह भत्ता मिळत नव्हता इतर क्रांतिकारकांनाही तो मिळत होता. आर्थिक अडचणीत असल्यामुळे सावरकरांनी ब्रिटिशांकडे निर्वाह भत्त्याची मागणी केली होती.

सावरकरांनी द्विराष्ट्रवाद मांडला असा एक आरोप त्यांच्यावर केला जातो. कर्णावती येथे १९३७ साली झालेल्या हिंदू महासभेच्या अधिवेशनातील अध्यक्षीय भाषणात त्यांनी केलेल्या भाषणा वरून करण्यात आला. स्वतः सावरकरांनी त्या नंतर अनेकदा दिलेल्या मुलाखतीमध्ये त्याचे स्पष्टीकरण दिलेले आहे. सावरकरांनी कधीच द्विराष्ट्र वादाचे समर्थन केलेले नाही, उलट अखंड हिंदुस्तान हे त्यांचे स्वप्न होते. त्यांच्यावर केलेला हा आरोप अत्यंत चुकीचाच आहे. राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या हत्ये मध्ये सावरकरांचा सहभाग होता असा एक आरोप सावरकरांवर केला जातो. प्रत्यक्षात गांधी हत्या खटल्यात सावरकरांना विशेष न्यायालयाने निर्दोष मुक्त केले होते हे वास्तव आहे. सदर पत्रकार परिषदेत भाजपा जिल्हाध्यक्ष आ. सुरेश भोळे (राजुमामा) यांनी माहिती दिली.

Share this:

  • Twitter
  • Facebook
  • Telegram
  • WhatsApp

Like this:

Like Loading...
Previous Post

चिमुकल्याचा जीव गुदमरल्यामुळे आई-वडीलांची पळापळ,अन्ननलिकेतून निघाले हनुमानजी

Next Post

श्री क्षेत्र वालझीरी संस्थानच्या दाधिकाऱ्यांनी मानले खा. उन्मेशदादा पाटील यांचे आभार

Next Post
श्री क्षेत्र वालझीरी संस्थानच्या दाधिकाऱ्यांनी मानले खा. उन्मेशदादा पाटील यांचे आभार

श्री क्षेत्र वालझीरी संस्थानच्या दाधिकाऱ्यांनी मानले खा. उन्मेशदादा पाटील यांचे आभार

वाढदिवस शुभेच्छा जाहिरात…

FACEBOOK PAGE

FACEBOOK PAGE

जैन इरिगेशन-गांधी तिर्थ, जळगाव

आई हॉस्पिटल, यावल

FOLLOW

ताज्या बातम्या

फालीच्या माध्यमातून शेतीला प्रतिष्ठा – अतुल जैन;फालीच्या नवव्या संमेलनाचा समारोप

फालीच्या माध्यमातून शेतीला प्रतिष्ठा – अतुल जैन;फालीच्या नवव्या संमेलनाचा समारोप

‘फार्मर ते फॉर्च्युनर’ प्रेरणादायी प्रवास..!  शेतकऱ्यांनी उलगडला कृषिविकासाचा पट

‘फार्मर ते फॉर्च्युनर’ प्रेरणादायी प्रवास..!  शेतकऱ्यांनी उलगडला कृषिविकासाचा पट

महाराष्ट्र दिनानिमित्त शासनाने काढले ‘हे’ आदेश; जाणून घ्या सविस्तर माहिती

‘या’ अभ्यासक्रमाच्या विद्यार्थिनींना मिळणार प्रसूती रजा….

दहावी पास नंतर करियरचे ‘हे’ पर्याय जे देतात लाखांपर्यंत नोकरीची हमी

दहावी पास नंतर करियरचे ‘हे’ पर्याय जे देतात लाखांपर्यंत नोकरीची हमी

पगार न मिळाल्यास रुग्णवाहिका चालक आंदोलन करणार ‘हे’ अनोखं आंदोलन

पगार न मिळाल्यास रुग्णवाहिका चालक आंदोलन करणार ‘हे’ अनोखं आंदोलन

काव्यरत्नावली चौक उजळला…

https://satymevjayate.com/wp-content/uploads/2022/10/VID-20221026-WA0000.mp4

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

महारष्ट्रातील घडामोडी तुमच्या मोबाईलवर

जाहिरात

TITAN HOSPITAL JALGAON

जैन इरिगेशन-गांधी तिर्थ, जळगाव

https://satymevjayate.com/wp-content/uploads/2021/06/गांधी-तीर्थ-जैन-इरिगेशन-.mp4

चित्रफीत दालन

https://youtu.be/TzzuE2yX3DI

कोरोना संदेश

जाहिरात

जाहिरात

DISCLAIMER

सदर वेब न्यूज चॅनल हे संपूर्ण महाराष्ट्रात प्रसारित होते. या ऑनलाईन वेब न्यूज चॅनल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही.

सत्यमेव जयते न्युज दिनदर्शिका – २०२२

बातम्या

Powered By Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय

Powered By Tech Drift Solutions.

सत्यमेव जयतेचे अपडेट्स व्हाटसअ‍ॅपवर मिळवा.

%d bloggers like this: