तुळशी माळ व श्री. तुकाराम गाथा ग्रंथ देऊन खासदारांचा सत्कार
खासदार उन्मेशदादा यांच्या पाठपुराव्यातून मिळालेल्या निधीमुळे वालझिरी तीर्थक्षेत्रावर भाविकांना अधिकाधिक सुविधा उपलब्ध करुन देऊ–देवस्थान समितीने व्यक्त केली कृतज्ञता
चाळीसगाव – (प्रतिनिधी) – तालुक्याच्या वैभवात भर घालणारे अनेक तीर्थक्षेत्र व वनसंपदा लाभली आहे. यात प्रामुख्याने रामायणकार महर्षी वाल्मीक ऋषी यांच्या वास्तव्याने पुनीत झालेली ही तपोभूमी खान्देशातच नव्हे राज्यात तसेच देशात प्रसिद्ध आहे देवस्थानाला खासदार उन्मेशदादा पाटील यांच्या दूरदृष्टी व नियोजनातून एक कोटी रुपयांचा निधी मंजूर झाला. या निधीमुळे या तीर्थक्षेत्राचा चौफेर विकास होणार असून श्री क्षेत्र वालझरी संस्थानास निधी मिळवून दिल्याबद्दल वारकरी भाविक भक्तांच्या सोबत आम्ही खासदार उन्मेशदादा पाटील यांचे सदैव ऋणी राहू. अशी प्रांजळ भावना आज श्री.क्षेत्र वालझिरी देवस्थान समितीने व्यक्त केली आहे.
आज खासदार उन्मेशदादा पाटील यांच्या प्रयत्नातून निधी मंजूर झाल्याने समिती सदस्यांनी प्रत्यक्ष भेटून त्यांचे आभार मानत अध्यक्ष वसंतराव देशमुख,सचिव सतीश देशमुख यांनी तुळशी माळ व श्री तुकाराम गाथा ग्रंथ देऊन खासदारांचा सत्कार केला. याप्रसंगी संस्थान सदस्य मच्छिंद्र राठोड, अजित सोमवंशी, विजय ठूबे, प्रशांत देशमुख, दिपक भोसले, सुनिल जाधव, वसुंधरा फाऊंडेशनचे सचिन पवार यांच्यासह वारकरी भाविक भक्त उपस्थीत होते.