<
आदिपुरुषच्या नवीन पोस्टरविरोधात मुंबई उच्च न्यायालयाचे वकील आशिष राय आणि पंकज मिश्रा यांच्यामार्फत तक्रार दाखल करण्यात आली आहे. तक्रारीत म्हटले आहे की, आदिपुरुष चित्रपटाच्या रिलीज पोस्टरमध्ये रामायणातील सर्व कलाकारांना पवित्र धागा(जनेऊ) न घालता दाखवण्यात आले आहे. जे चुकीचे आहे.
चित्रपट निर्मात्याने ‘रामचरितमानस’ या हिंदी धार्मिक पुस्तकातील पात्राचे अयोग्य चित्रण केल्याचे तक्रारीत म्हटले आहे. ‘आदिपुरुष’ या बॉलिवूड चित्रपटाच्या नव्याने प्रदर्शित झालेल्या पोस्टरमध्ये हिंदू धर्मीय समाजाच्या धार्मिक भावना दुखावल्या गेल्या आहेत. भारतीय दंड संहितेच्या कलम 295 (A), (A), 298, 500, 34 अंतर्गत एफआयआर नोंदवण्याच्या मागणीसह ही तक्रार दाखल करण्यात आली आहे.
त्याचवेळी, रिलीज झालेल्या पोस्टरमध्ये क्रिती सेननला सिंदूर नसलेली अविवाहित स्त्री दाखवण्यात आली आहे. यावरून तिला अविवाहित स्त्री म्हणून दाखवले जात असल्याचे स्पष्ट झाले आहे. बॉलिवूड चित्रपट निर्माते, दिग्दर्शक आणि अभिनेत्यांनी हे जाणूनबुजून केले आहे, असे फिर्यादीत म्हटले आहे. असे करून ते सनातन धर्माचा अपमान करत आहेत. हे अत्यंत निंदनीय आहे. आदिपुरुषांच्या पोस्टर्समध्ये हिंदू धर्माचा अपमान करण्यात आला आहे. यामुळे भविष्यात भारतातील विविध राज्यांमध्ये कायदा आणि सुव्यवस्थेला नक्कीच धोका निर्माण होऊ शकतो.