<
उद्या सगळ्या सुशिक्षित बेरोजगारांना उपस्थित राहण्याचे आव्हान
जळगाव शहरात ७ एप्रिल रोजी
सकाळी ११:३० ते दु ४:३० या वेळेत डॉ. प्रा. विलास खरात भारतीय बेरोजगार मोर्चाचे राष्ट्रीय प्रचारक यांच्या अध्यक्षतेखाली बेरोजगारों की संसदचे आयोजन करण्यात आले आहे..
देशात स्वातंत्र्याच्या ७५ वर्षानंतरही देश प्रगतीकडे कमी आणि अधोगतीकडे जास्त जाताना दिसत आहे. याचे महत्त्वाचे कारण देशात ३५ करोडपेक्षा जास्त युवक व युवती बेरोजगारांच्या गर्तेत लोटल्या गेलेले आहेत. मात्र कुठल्याही सरकारकडून बेरोजगारी थांबवण्यासाठी कोणत्याच प्रकारची उपाययोजना करण्यात आलेली दिसून येत नाही. परिणामी बेरोजगार निराशाजनक जीवन जगत आहे, बेरोजगारींमुळे लग्न होत नाहीत. परिणामी सरकारी आकड्यांवरून तरुण बेरोजगारांच्या दिवसाला ६० आत्महत्या देशभरात होतांना दिसत आहे. ही राष्ट्रीय पातळीची समस्या सोडवण्यासाठी
कोणतेही लोकप्रतिनिधी विधानसभेत, संसदेत बेरोजगारांचा आवाज उठवितांना दिसत नाही. त्यामुळे भारतीय बेरोजगार मोर्चाच्या माध्यमातून देशभरात बेरोजगारांची संसद या कार्यक्रमाचे आयोजन करून देशातील लाखो करोडो बेरोजगार युवकांना जागृत करून त्यांच्या समस्यांचे समाधान करण्यासाठी सरकारवर दबाव वाढवण्यात येईल. तसेच त्यांच्या घरांवर, कार्यालयांवर भारतीय बेरोजगार मोर्चाच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणावर मोर्चा काढण्यात येईल, अशी माहिती भारतीय विद्यार्थी मोर्चाचे जिल्हाध्यक्ष प्रद्युम्न वारडे, भारतीय युवा मोर्चाचे जिल्हाध्यक्ष विश्वास साबळे व भारतीय बेरोजगार मोर्चा चे जिल्हाध्यक्ष राहुल सपकाळे यांनी प्रतिनिधींना बोलतांना दिली. तसेच ७ एप्रिल शुक्रवार रोजी, स ११:३० ते ४:३० वाजेपर्यंत जिल्हाधिकारी कार्यालय येथे खांदेश स्तरिय होणाऱ्या महत्वपूर्ण कार्यक्रमाला विद्यार्थी, युवा, बेरोजगारांना रोजगार उपस्थित राहण्याचे आयोजकांतर्फे आवाहन करण्यात आले.