<
बामसेफच्या भारतीय बेरोजगार मोर्चा या सहयोगी संघटनेच्या “बेरोजगारोंकी संसद” या अभिनव कार्यक्रमास जळगाव,धुळे,नाशिक व नंदुरबार जिल्ह्यातील शेकडो बेरोजगारांचा उत्स्फुर्त प्रतिसाद
बेरोजगारी, खाजगीकरण व ईव्हीएम मशिनमुळे देश गुलामीच्या उंबरठ्यावर…. सिध्दांत मौर्या यांचे प्रतिपादन
वर्तमानात बेरोजगारीने थैमान घातले आहे.केंद्र सरकार एका मागोमाग सरकारी क्षेत्राचे खाजगीकरण करत आहे.सामाजिक न्यायाला संपुर्णपणे तिलांजली दिली आहे.
या सर्वांच्या माध्यमातून केवळ बेरोजगारच नाही तर लाचारांच्या फौजा निर्माण केल्या जात आहेत.हा संपुर्ण देश मोठ्या गतीने मार्गक्रमण करत आहे….असे प्रतिपादन विक्की बेलखोडे राष्ट्रीय बेरोजगार मोर्चाचे राष्ट्रीय संयोजक यांनी केले.
ईव्हीएम चा वापर करुन वर्तमान सरकार संविधान द्रोही काम करत आहे.म्हणुन आज भयावह परिस्थिती निर्माण झाली आहे. हे सर्व थांबयावयाचे असेल तर विद्यार्थी , युवा, बेरोजगार, कर्मचारी,कामगार,शेतकरी यांनी भारतात एकजुट होऊन जनआंदोलन शिवाय दुसरा पर्याय नाही…..असे प्रतिपादन भारतीय बेरोजगार मोर्चाचे राष्ट्रीय प्रभारी सिध्दात मोर्या यांनी केले.
भारतीय बेरोजगार मोर्चाच्या माध्यमातुन येथील अल्पबचतभवन मध्ये “बेरोजगारांची संसद”या आगळ्यावेगळ्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.
कार्यक्रमाचे उद्घाटन मा.गोपाल दर्जी यांनी केले.आपल्या देशात तरुणाईचे मनोबल खच्ची केले जात आहे.मात्र कौशल्य विकसित करण्याची जबाबदारी ही सरकारची असते.या देशातील तरुणाईला आत्महत्या करण्यास भाग पाडले जात आहे. दर्जी फाऊंडेशन मार्फत गरीब होतकरु विद्यार्थ्यांना मोफत प्रवेश दर्जी फाऊंडेशन मार्फत दिले जाईल.असे उद्घाटकीय भाषणात व्यक्त केले.
कार्यक्रमाचे अध्यक्ष सिध्दांत मौर्या होते.
वक्ते म्हणुन डॉ.प्रकाश कांबळे, शशिकांत हिंगोणेकर,प्रा.माधव पाटील, डॉ.राहुल भोईटे,यांनी आपले विषयानुचित मनोगत व्यक्त केले.
डॉ.राहुल भोईटे यांनी बेरोजगारांची प्रश्नोत्तराद्वारे संसदेचे चित्रच सभागृहात निर्माण केले.
विचारपीठावर ॲड.कुंवरसिंग वळवी,लालसिंग तडवी,वसंत कोलते हे उपस्थित होते.
दिलदार बहुजन समाज
आर.बी.परदेशी साहेबांनी सिध्दांत मौर्या यांना २००० रुपयांच्या नोटांचा हार जनाआंदोलनासाठी घातला.
हाताला काम नाही,रोजगार कमी तरी बेरोजगारांनी शासनकर्ती जमात बनण्यासाठी बेरोजगारांनी ६००० रुपयांचा जनआंदोलन निधी सिध्दांत मौर्या व विक्की बेलखोडे यांच्याकडे सुपूर्द केला.
कार्यक्रमाचे प्रद्युम्न वारडे, प्रास्ताविक विश्वास साबळे व आभार राहुल सपकाळे यांनी मानले.