<
यावल-(प्रतिनिधी) – यावल वनविभाग जळगांव मधील यावल येथे मा. श्री. डिगंबर पगार वनसंरक्षक सो धुळे (प्रादेशिक)वनवृत्त धुळे यांचे हस्ते मा.श्री.जमीर शेख उपवनसंरक्षक यावल वनविभाग जळगांव, मा. श्री. प्रथमेश हडपे सहाय्यक वनसंरक्षक चोपडा/ यावल, यांचे प्रयत्नाने वनाचे संरक्षण कामात उपयोगी असलेले साहित्यात दुर्बीण, कापडी तंबू, जीपीएस यंत्र, बॅटरी , वनउपज तपासणी नाक्यावर आणि मिळालेली बातमी नुसार रस्तावर वाहनांची तपासणी करिता वाहने थांबविण्यासाठी आवश्यक असलेले बॅरिगेट, तसेच अवैध अतिक्रमण काढण्याचे, अवैध वृक्ष तोड नियंत्रण करण्याचे कार्यवाही दरम्यान जमावापासून वनअधिकारी, वनकर्मचारी यांना स्वसंरक्षणासाठी शील्ड, हेल्मेट आणि चेस्ट गार्ड प्रोटेटोर आदी असलेले आवश्यक साहित्य वनपरिक्षेत्र अधिकारी यावल पुर्व, यावल पश्चिम, रावेर,गस्ती पथक यावल आणि वनपाल यांना साहित्य वाटप करण्यात आले. मा. श्री.डिगंबर पगार वनसंरक्षक धुळे आणि मा. श्री.जमीर शेख उपवनसंरक्षक यावल वनविभाग जळगांव यांनी वनअधिकारी , वनकर्मचारी यांनी वनसंरक्षण कामात हलगर्जीपणा करु नये .अवैधरित्या असलेले अतिक्रमण काढण्याची कार्यवाही करावे. तसेच वन्यजीव संरक्षण आणि जंगल संरक्षण कामकाज करण्यात येईल असे मार्गदर्शन केले.
या कार्यक्रमात श्री. विक्रम पदमोर वनपरिक्षेत्र अधिकारी यावल पुर्व, श्री. सुनील भिलावे वनपरिक्षेत्र अधिकारी यावल पश्चिम, श्री. अजय बावणे वनपरिक्षेत्र अधिकारी रावेर, वनपाल श्री. रविंद्र तायडे, अतुल तायडे,रज्जाक तडवी,राजेंद्र खर्चे, विपुल पाटील, राजु पाटील,विजय बोराडे,रविंद्र सोनवणे,अरविंद धोबी,राजु जाधव यांचे उपस्थितीत कार्यक्रम झाला.या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री. विक्रम पदमोर वनपरिक्षेत्र अधिकारी यावल पुर्व यांनी केले.तसेच आभार प्रदर्शन श्री. प्रथमेश हडपे सहाय्यक वनसंरक्षक यावल यांनी केले.