<
जळगाव – (प्रतिनिधी) – सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था बार्टी, पुणे-जिल्हा जळगाव व सहा. आयुक्त समाज कल्याण कार्यालय जळगाव यांच्या संयुक्त विद्यमाने सामाजिक न्याय पर्व-२०२३ च्या अनुषंगाने “स्वयं सहाय्यता युवा गट उद्योजकता प्रशिक्षण कार्यशाळा” आयोजित करण्यात आलेली होती. मा.सहा.आयुक्त श्री.योगेश पाटील सर यांच्या मार्गदर्शनाखाली सदरील कार्यशाळा संपन्न झाली.
कार्यशाळेच्या सुरुवातीला विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला मान्यवरांकडून माल्यार्पण करून अभिवादन करण्यात आले व राष्ट्रीय पृथ्वी दिवस हि साजरा करण्यात आला. कार्यशाळेचे प्रास्ताविक श्री.युनुस तडवी (प्रकल्प अधिकारी, बार्टी) यांनी केले त्यानंतर सर्व मान्यवरांचे स्वागत करण्यात आले.
सदरील कार्यक्रमाचे अध्यक्ष मा.अरूण कुमार सिंह (संचालक, सेन्ट ग्रामीण स्वयंरोजगार प्रशिक्षण संस्था R-SETI जळगाव) होते. त्यांनी युवाटातील सदस्यांना R-SETI मार्फत होणाऱ्या विविध प्रशिक्षणास बार्टीतील स्वयं सहाय्यता युवा गट सदस्यांना प्राधान्यक्रम दिले जाईल व R-SETI तील सर्व प्रशिक्षण युवा गटांना दिले जातील असे आश्वासित करून सविस्तर मार्गदर्शन केले. यानंतर मा. राहुल संदानशिव (प्रशिक्षक- सेंट ग्रामीण स्वयंरोजगार प्रशिक्षण संस्था R-SETI) यांनी R-SETI मार्फत चालविल्या जाणाऱ्या विविध प्रशिक्षणासंदर्भात PPT presentation द्वारे सर्वस्वी माहिती दिली त्यानंतर मा.देवेंद्र महाजन सर (प्रशिक्षक-जिल्हा ग्रामीण स्वयंरोजगार प्रशिक्षण संस्था R-SETI) यांनी विविध प्रशिक्षणासाठी युवागट सदस्यांना विविध प्रशिक्षणांची माहिती देत मार्गदर्शन केले.
सदरील कार्यक्रमास; मा. करनसिंह सोलंकी प्रशिक्षक तसेच ग्रामीण स्वयंरोजगार प्रशिक्षण संस्था R-SETI चे सर्व कर्मचारी समतादूत प्रकल्प अधिकारी, समतादूत सरला गाढे, कल्पना बेलसरे, शिल्पा मालपूरे तसेच मोठ्या संख्येने स्वयं सहाय्यता युवा गटातील प्रशिक्षणार्थी उपस्थित होते.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार समतादूत कल्पना यांनी मानले.