Wednesday, May 7, 2025
सत्यमेव जयते
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
सत्यमेव जयते
No Result
View All Result

मराठी पाऊल पडते पुढे ५ मे रोजी प्रदर्शित होणार…

टिम-सत्यमेव जयते by टिम-सत्यमेव जयते
27/04/2023
in मनोरंजन, सिने जगत
Reading Time: 1 min read
मराठी पाऊल पडते पुढे ५ मे रोजी प्रदर्शित होणार…

५ मे च्या मुहूर्तावर अभिनेता चिराग पाटील आणि सिदधी पाटणे टाकणार एक पाऊल पुढे…..

चित्रपटाच्या १००% निव्वळ नफ्याचा विनियोग चित्रपटातील कलाकार आणि समाजकार्यासाठी -निर्माता प्रकाश बाविस्कर

जळगाव – (प्रतिनिधी) – मराठी मालिका विश्वातून थेट ८३ (एटी थ्री) ह्या बॉलीवूडपटात झळकलेला आणि स्टार क्रिकेटपटू संदीप पाटील यांचा चिरंजीव अभिनेता चिराग पाटील आणि ‘गोव्याच्या किनाऱ्यावर… रुपेरी वाळूत सोनेरी लाटावर स्वार झालेली अभिनेत्री सिद्धी पाटणे यांच्या लव्हस्टोरीने सजलेला ‘मराठी पाऊल पडते पुढे’ हा सिनेमा ५ मे रोजी संपूर्ण महाराष्ट्रभर प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटाच्या निमित्ताने चिराग आणि सिदधी हे प्रथमच एकत्र आले आहेत. मराठी चित्रपटसृष्टीला हवा असलेला आणि या सिनेमाच्या कथानकाला साजेसा असा उंच शरिरयष्टी आणि देखणा नायक चिरागच्या रुपाने मिळाला आहे. म्युझिक अल्बमच्या माध्यमातून घराघरात पोहोचलेली सौंदर्यवती सिदधी पाटणेची रोमँटीक साथ चिरागला लाभली आहे. रीयल लाईफमध्ये स्टाईल आयकॉन असणाऱ्या या दोन्ही कलाकारांची मराठी पाऊल पडते पुढे या सिनेमातील केमिस्ट्री मोठ्या पडद्यावर पाहाणं औत्सुक्याचे ठरेल.

नुकताच या चित्रपटाचा संगीत प्रकाशन सोहळा ज्येष्ठ विधीज्ञ पद्मश्री अॅड. उज्ज्वल निकम यांच्या शुभहस्ते दि. १३ एप्रिल २०२३ रोजी दादर येथे करण्यात आला. “मराठी पाऊल पडते पुढे या चित्रपटाचा ट्रेलर पाहून हा चित्रपट मराठी तरुणांना संघर्ष करण्याची प्रेरणा देणारा आहे, याची मला खात्री झाली. आयुष्य हे बागडण्याचे क्रीडांगण नसून प्रतिकुल परिस्थितीत झुंज देण्याचं रणांगण आहे, हा संदेश ह्या चित्रपटाच्या माध्यमातून लोकांपर्यंत पोहोचेल, निर्माते प्रकाश बावीस्कर हे माझ्या जिल्हयातील आहेतच पण माझे चांगले मित्रही आहेत, मी त्यांच्या पाठीशी ठामपणे उभा आहे.” असे गौरवोदगार विशेष सरकारी वकील पदमश्री अॅड. उज्ज्वल निकम यांनी चित्रपटाच्या संगीत प्रकाशन सोहळ्यानिमित काढले. मराठी माणूस हा केवळ नोकरीत रमणारा नाही तर व्यवसायात उतरून नोकऱ्या देणारा होऊ शकतो असे वातावरण हा चित्रपट निर्माण करेल, अशी आशा आहे. मराठी बांधकाम व्यावसायिक महासंघ हा निर्माता प्रकाश बाविस्कर आणि चित्रपटाच्या संपूर्ण टीमच्या सोबत आहे, अशी ग्वाही श्री. सुरेश हावरे यानी हया

तसेच या चित्रपटाच्या संदर्भात दि. १८.०४. २०२३ रोजी पुणे, २१.०४ २०२३ रोजी नाशिक दि. २३.०४.. २०२३ रोजी धुळे येथे पत्रकार परिषद पार पडलेल्या आहेत. आज दि. २४.०४.२०२३ रोजी हॉटेल रॉयल पॅलेस येथे देखिल या चित्रपटाच्या संदर्भात पत्रकार परिषद संपन्न झाली. या पत्रकार परिषदेश निर्माते श्री प्रकाश बाविस्कर, चित्रपटाचा मुख्य अभिनेता चिराग व मुख्यअभिनेत्री सिद्धी पाटने हे उपस्थित होते.

मराठी पाऊल पडते पुढे हे शीर्षक वाचून चित्रपट पाहण्याची उत्सुकता अधिक वाढते. असामान्य कर्तृत्व गाजवलेल्या अनेक मराठी दिग्गजांनी जगाच्या नकाशावर आपली पताका डौलाने फडकवली. पण, तरीही एकूण मराठी भाषिकांमध्ये व्यावसायिकता, उद्यमशीलता आणि व्यापक दृष्टीकोन ठेवून कार्य करण्याची वृत्ती नसते, असा एक ढोबळ समज आहे. अर्थात, त्याला अनेक कारणे असू शकतात. स्वप्न सत्यात उतरविण्यासाठी संघर्ष हा अटळ आहे, आणि तो करण्यासाठी आजचा मराठी तरुण कुठेही कमी नाही. फक्त पाठीवर हात ठेवून लढ म्हणणाऱ्यांची गरज आहे. ही गरज, प्रेरणा आणि ऊर्जा प्रभावी मनोरंजनाद्वारे देण्यासाठी तसेच समस्त मराठी मन आणि मनगटे मजबूत करण्यासाठी निर्माता प्रकाश बाविस्कर यांची निर्मिती व शिवलाईन फिल्म्सची प्रस्तुती असलेला ‘मराठी पाऊल पडते पुढे’ हा चित्रपट ५ मे पासून संपूर्ण महाराष्ट्रात प्रदर्शनासाठी सज्ज झाला आहे. मराठी तरुणांना व्यसायाकडे वाटचाल करण्याकरीता प्रोत्साहन देणारा आणि संघर्षातून यश कसे प्राप्त करता येते याचे मार्गदर्शन करणारा हा चित्रपट आहे.

निर्माते प्रकाश बाविस्कर हे सुध्दा एक व्यवसायिक आहेत. लेखक-दिग्दर्शक स्वप्निल मयेकर यांनी लिहिलेल्या कथेमध्ये व्यवसायाऐवजी मराठी माणूस नोकरीला जास्त महत्व देतो. पण, काही मोजक्या व्यक्तीच व्यवसायाकडे वळतात. मात्र नायकाला इतर प्रस्थापित व्यावसायिकांकडून त्रास होतो. हे प्रस्थापित व्यावसायिक राजकीय मंडळी व अधिकारी यांच्याशी अभद्र युती करुन येन केन प्रकारे उभरत्या व्यवसायिकांना त्रास देतात. त्याविरोधात नायक करीत असलेला संघर्ष, त्याची व्यावसायिक मानसिकता, सचोटी व अडचणीतून मार्ग काढण्याचा रोख कसा असावा? हे चित्रपटाच्या माध्यमातून मांडले आहे. चित्रपटाच्या माध्यमातून येणाऱ्या निव्वळ नफ्यातील दहा टक्के रक्कम कलाकारांना आणि उर्वरीत भाग हा मराठी तरुणांना व्यवसाय मार्गदर्शनासाठी, आत्महत्याग्रस्त शेतक-यांच्या मुलांसाठी आणि वृध्दाश्रमासाठी देऊ केला आहे, म्हणून हा चित्रपट प्रत्येकाला पाहावाच लागेल. त्याचबरोबर चित्रपटाचे लकी ड्रॉ तिकीट मिळविण्यासाठी ८९५५ ४४ ११ ३३ या क्रमांकावर मिस कॉल देण्याचे आवाहन निर्माता श्री. प्रकाश बाविस्कर यांनी केले आहे.

अकात फिल्म्सचे चंद्रकांत विसपुते हे या चित्रपटाचे सहनिर्माते आहेत. संगीत दिग्दर्शक समीर खोले यांनी सिनेमाची सर्व गाणी संगीतबद्ध केली आहेत. स्वप्नील मयेकर लिखित-दिग्दर्शित तसेच चिराग पाटील, सिद्धी पाटणे, जेष्ठ अभिनेते अनंत जोग, सतीश पुळेकर, सतीश सलागरे, संजय क्षेमकल्याणी आणि प्रदीप कोथमिरे यांच्या प्रमुख भूमिका असलेला हा चित्रपट मनोरंजनाबरोबरच मराठी तरुणांच्या स्वप्नांना बळ देणारा आणि भविष्याप्रती जागरुक करणारा ठरेल असे निर्माते प्रकाश बाविस्कर म्हणाले.

2

टिम-सत्यमेव जयते

Share this:

  • Twitter
  • Facebook
  • Telegram
  • WhatsApp

Like this:

Like Loading...

Previous Post

जैन इरिगेशनचा सेंट्रल सिट्रस रिसर्च इन्स्टिटयूट सोबत एसटीजी तंत्र प्रशिक्षणासाठी सामंजस्य करार

Next Post

पतीच्या विश्वासाला तडा; पत्नीच्या DNA टेस्टमुळे ‘हे’ विचित्र सत्य आलं समोर…

Next Post
पतीच्या विश्वासाला तडा; पत्नीच्या DNA टेस्टमुळे ‘हे’ विचित्र सत्य आलं समोर…

पतीच्या विश्वासाला तडा; पत्नीच्या DNA टेस्टमुळे 'हे' विचित्र सत्य आलं समोर...

जैन इरिगेशन-गांधी तिर्थ, जळगाव

FACEBOOK PAGE

FOLLOW

ताज्या बातम्या

कृषिक्षेत्रातील भविष्य अधोरेखित करणारे फालीचे जैन हिल्स येथे २७ एप्रिल पासून अकरावे अधिवेशन

कृषिक्षेत्रातील भविष्य अधोरेखित करणारे फालीचे जैन हिल्स येथे २७ एप्रिल पासून अकरावे अधिवेशन

विश्व नवकार महामंत्राच्या दिवशी नऊ संकल्पातून सृष्टीचे संवर्धन करुया –  पंतप्रधान नरेंद्र मोदी

विश्व नवकार महामंत्राच्या दिवशी नऊ संकल्पातून सृष्टीचे संवर्धन करुया – पंतप्रधान नरेंद्र मोदी

स्वच्छ महाराष्ट्र अभियान २.० अंतर्गत जळगाव महानगरपालिकेच्या घनकचरा व्यवस्थापन प्रकल्पास मंजुरी;आ.सुरेश दामू भोळे यांच्या पाठपुराव्याला यश

स्वच्छ महाराष्ट्र अभियान २.० अंतर्गत जळगाव महानगरपालिकेच्या घनकचरा व्यवस्थापन प्रकल्पास मंजुरी;आ.सुरेश दामू भोळे यांच्या पाठपुराव्याला यश

तीर्थंकर प्रभू श्री महावीर यांच्या जन्मकल्याणक महोत्सवास उत्साहात प्रारंभ

तीर्थंकर प्रभू श्री महावीर यांच्या जन्मकल्याणक महोत्सवास उत्साहात प्रारंभ

उच्च शिक्षण विभागाकडे हस्तांतरणाची प्रक्रिया- समस्या आणि उपाययोजना एक दिवसीय कार्यशाळा संपन्न

उच्च शिक्षण विभागाकडे हस्तांतरणाची प्रक्रिया- समस्या आणि उपाययोजना एक दिवसीय कार्यशाळा संपन्न

महारष्ट्रातील घडामोडी तुमच्या मोबाईलवर

चित्रफीत दालन

Video Player
https://youtu.be/TzzuE2yX3DI
00:00
00:00
03:54
Use Up/Down Arrow keys to increase or decrease volume.

DISCLAIMER

सदर वेब न्यूज चॅनल हे संपूर्ण महाराष्ट्रात प्रसारित होते. या ऑनलाईन वेब न्यूज चॅनल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही.

बातम्या

Select Category

    Powered By Tech Drift Solutions.

    No Result
    View All Result
    • Home
    • रोजगार
    • लैंगिक शिक्षण
    • माहितीचा अधिकार २००५
    • शैक्षणिक
    • राज्य
    • राष्ट्रीय
    • राजकारण
    • लेख
    • संपादकीय

    Powered By Tech Drift Solutions.

    सत्यमेव जयतेचे अपडेट्स व्हाटसअ‍ॅपवर मिळवा.
    %d

      Notifications