<
कॉलेजला शिक्षण घेत असताना अनेक विद्यार्थी स्वतःचा खर्च भागवता यावा, यासाठी पार्ट टाईम जॉब करतात. यामुळे विद्यार्थी स्वावलंबी बनतात, शिवाय स्वतःच्या कमाईतून शिक्षणासाठी आवश्यक असणाऱ्या तसेच इतरही छोट्या छोट्या गरजा भागवत असतात.
1.फोटोग्राफी:- जर तुम्हाला फोटोग्राफीची आवड असेल, तर तुम्ही तुमची ही आवड पार्ट टाईम व्यवसायात बदलून पैसे कमवू शकता. हा एक चांगला पार्ट टाईम व्यवसाय आहे.
2. डिजिटल मार्केटिंग:- तुम्ही कॉलेज सुरू असताना डिजिटल मार्केटिंगचे पार्ट टाईम काम करू शकता. यासाठी फक्त डिजिटल मार्केटिंग शिकावं लागेल. त्यानंतर एखाद्या कंपनीचं डिजिटल मार्केटिंगचं काम तुम्ही घेऊ शकता.
3. ब्लॉगिंग:- तुम्हाला लेखनाची आवड असेल, तर तुम्ही स्वतःचा ब्लॉग लिहू शकता. तसेच फ्रीलान्सर म्हणून एखाद्या वर्तमानपत्रासाठी, न्यूज पोर्टलसाठी लेखन करून पैसे कमवू शकता.
4. वेब डेव्हलपर:- वेब डेव्हलपरचं पार्ट टाईम काम करून पैसे कमावता येतील. यासाठी सर्वात प्रथम वेबसाइट क्रिएशन आणि कोडिंग आदींचं ज्ञान घ्यावं लागेल. यानंतर तुम्ही एखाद्या कंपनीची किंवा संस्थेची वेबसाइट तयार करून पैसे कमावू शकता.
5. डेटा एंट्री:- ऑपरेटर आजकाल बहुतांश कॉलेजच्या विद्यार्थ्यांकडे लॅपटॉप किंवा कॉम्प्युटर असतो. हे काम ऑनलाइन उपलब्ध आहे. डॉक्युमेंट किंवा डेटाबेसमध्ये तुम्हाला डेटा दिला जातो. त्या डेटाची एंट्री करून तुम्ही पैसे कमवू शकता.
6. विविध प्रॉडक्टची विक्री:- तुम्ही एखाद्या उत्पादक किंवा होलसेल विक्रेत्यांकडून प्रॉडक्ट घेऊन ते ग्राहकाला विकून नफा कमावू शकता. या प्रॉडक्टची विक्री करण्यासाठी पारंपरिक किंवा इंटरनेट माध्यम वापरता येऊ शकते.
Job no. 5.deta entry