<
काय आहे योजना:- भारतात बारा ज्योर्तिलिंग आहेत. त्यापैकी पाच ज्योर्तिलिंग सोबत शिर्डी अन् शनीशिंगणापूर तुम्हाला करता येणार आहे. या पॅकेजमध्ये ओंकारेश्वर, महाकालेश्वर, सोमनाथ, नागेश्वर व नाशिक जिल्ह्यातील त्र्यंबकेश्वर तुम्हाला करता येणार आहे. २० मे पासून हे टूर पॅकेज सुरु होणार आहे. त्यासाठी विशेष रेल्वे असणार आहे. हा सर्व प्रवास भारत गौरव स्पेशल पर्यटक ट्रेनच्या माध्यमातून होणार आहे. या टूर पॅकेजला प्रारंभ कोलकाता येथून होणार आहे.
काय आहे पॅकेज:- आयआरसीटीसीचा हा टूर पॅकेज दहा दिवसांचा आहे. या पॅकेजमध्ये पाच ज्योर्तिलिंगसोबत स्टॅच्यू ऑफ युनिटी, शिर्डी साई मंदिर, शनी शिंगणापूरचे दर्शन करता येणार आहे. या पॅकेजचे बोर्डिंग व डिबोर्डिंग बंडेल, बर्द्धमान, बोलपूर, शांती निकेतन, रामपूर हाट, पाकुड, साहिबगंज, कहलगाव, भागलपूर, जमालपूर, किउल, बरौनी, समस्तीपूर, मुजफ्फरपूर, हाजीपूर, पाटलीपूत्र, आरा, बक्सर, पं. दीनदयाल उपाध्याय जंक्सन आणि प्रयागराज स्टेशनवरुन करता येणार आहे.
पॅकेजसाठी ईएमआय पर्याय:- टूर पॅकेजसाठी आयआरसीटीसीने ईएमआयचा पर्याय दिला आहे. पॅकेजमध्ये इकोनॉमी क्लास (शयनयान श्रेणी), स्टँडर्ड (थर्ड एसी) आणि कंफर्ट (सेंकड एसी) क्लास उपलब्ध आहे. यामध्ये राहण्याची व खाण्याची व्यवस्था करण्यात आली आहे. इकोनॉमी क्लाससाठी 315 बर्थ असून त्यासाठी 20,060 रुपये आकारले जाणार आहे. या पॅकेजमध्ये नॉन एसी बजट हॉटेलमध्ये राहता येणार आहे. स्टँडर्ड श्रेणीत 31,800 रुपये द्यावे लागणार असून एसी हॉटेलमध्ये मुक्काम असणार आहे. कंफर्ट क्लासमध्ये 41,600 रुपये द्यावे लागणार असून एसी हॉटलमध्ये मुक्कम असणार आहे. पॅकेजसंदर्भात बुकिंगसाठी आयआरसीटीसीच्या वेबसाइटवर भेट द्या.