Monday, June 22, 2026
सत्यमेव जयते
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
सत्यमेव जयते
No Result
View All Result

शेतकऱ्यांना दिलासा! आता एकाच ठिकाणी घेता येणार सर्व योजनांचा लाभ

Team Satymev Jayate by Team Satymev Jayate
28/04/2023
in विशेष
Reading Time: 1 min read
शेतकऱ्यांना दिलासा! आता एकाच ठिकाणी घेता येणार सर्व योजनांचा लाभ

मागेल त्याला शेततळे योजनेच्या यशानंतर आता कृषी विभागाने मागेल त्याला फळबाग, ठिबक-तुषार, शेततळे अस्तरीकरण, शेडनेट-हरितगृह, आधुनिक पेरणीयंत्रे आणि कॉटन श्रेडर या योजना राबविण्याचा निर्णय घेतला आहे.महाडीबीटी पोर्टलवर अर्ज केल्यानंतर पात्र शेतकऱ्यांना याच पोर्टलद्वारे अनुदान वाटप होणार आहे. यामुळे शेतकरी लाभाच्या योजनांना गती मिळू शकेल.

शेतकऱ्यांना आवश्यक घटकांची मागणी केल्यावर तातडीने उपलब्धता झाल्यास नक्कीच शेती उत्पादनात वाढीसाठी मोठ्या प्रमाणात फायदा होतो. त्यामुळे शासनाने मागेल त्याला शेततळे योजनेचा विस्तार करण्याची घोषणा केली होती. त्यालाच अनुसरून आता मागेल त्याला फळबाग, ठिबक व तुषार सिंचन, शेडनेट, हरितगृह पेरणी यंत्रे शेततळ्याच्या अस्तरीकरण हे साहित्य उपलब्ध होणार असल्याने याचे सर्व स्तरातून स्वागत होत आहे.

सध्या सुरू असलेल्या एकात्मिक फलोत्पादन विकास अभियान व भाऊसाहेब फुंडकर फळबाग लागवड योजनेतून मागेल त्याला फळबाग देण्यात येईल. राष्ट्रीय कृषी विकास योजनेतून सूक्ष्म सिंचन, मुख्यमंत्री शाश्वत कृषी सिंचन योजनेतून शेततळे, राष्ट्रीय कृषी विकास एकात्मिक फलोत्पादन, मुख्यमंत्री शाश्वत कृषी सिंचन, बिरसा मुंडा कृषी क्रांती व डॉ. बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजनेतून शेततळ्याचे अस्तरीकरण केले जाणार आहे. याच योजनांमधून मागेल त्याला शेडनेट व हरितगृह देखील मिळणार आहे.

कृषी यांत्रिकीकरण उपअभियान व राज्य पुरस्कृत कृषी यांत्रिकीकरण योजनेतून मागेल त्याला आधुनिक पेरणी यंत्र आणि कॉटन श्रेडर हे साहित्य मिळणार आहे. चालू आर्थिक वर्षासाठी ही योजना राबविली जाणार असून या बदलाचे शेतकऱ्यांकडून स्वागत होत आहे.

Team Satymev Jayate

Previous Post

महाराष्ट्र दिनानिमित्त शासनाने काढले ‘हे’ आदेश; जाणून घ्या सविस्तर माहिती

Next Post

सत्य’ जाणून घेण्यासाठी प्रयोग करणे आवश्यक – बरूण मित्रा

Next Post
सत्य’ जाणून घेण्यासाठी प्रयोग करणे आवश्यक – बरूण मित्रा

सत्य' जाणून घेण्यासाठी प्रयोग करणे आवश्यक - बरूण मित्रा

जैन इरिगेशन-गांधी तिर्थ, जळगाव

FOLLOW

ताज्या बातम्या

नाशिक रोड मध्यवर्ती कारागृहात ‘आंतरराष्ट्रीय योग दिन’ उत्साहात संपन्न; कैदी आणि अधिकारी वर्गाचा उत्स्फूर्त प्रतिसाद

नाशिक रोड मध्यवर्ती कारागृहात ‘आंतरराष्ट्रीय योग दिन’ उत्साहात संपन्न; कैदी आणि अधिकारी वर्गाचा उत्स्फूर्त प्रतिसाद

फाली शेतीचे ‘पॉवर हाऊस’ शेतकरी-उद्योजक प्रतिनिधीचा सुर; फाली-१२ वार्षिक अधिवेशनच्या अंतिम टप्प्याची सुरूवात

फाली शेतीचे ‘पॉवर हाऊस’ शेतकरी-उद्योजक प्रतिनिधीचा सुर; फाली-१२ वार्षिक अधिवेशनच्या अंतिम टप्प्याची सुरूवात

जैन हिल्स ला प्रधानमंत्री विकसित भारत रोजगार योजनेचा विशेष कार्यक्रम;प्रोत्साहन अनुदान थेट लाभार्थ्यांना होईल हस्तांरण;पंतप्रधान नरेंद्र मोदींची असेल ऑनलाईन उपस्थिती

जैन हिल्स ला प्रधानमंत्री विकसित भारत रोजगार योजनेचा विशेष कार्यक्रम;प्रोत्साहन अनुदान थेट लाभार्थ्यांना होईल हस्तांरण;पंतप्रधान नरेंद्र मोदींची असेल ऑनलाईन उपस्थिती

राज्यस्तरीय स्पर्धेसाठी जळगाव जिल्हाचा फुटबॉल संघ रवाना

राज्यस्तरीय स्पर्धेसाठी जळगाव जिल्हाचा फुटबॉल संघ रवाना

जिल्हाधिकारी कार्यालयात पेंशन व पी.एफ. कार्यशाळा संपन्न;निवृत्तीवेतनधारकांच्या ११२ प्रश्नांपैकी ८० टक्के प्रश्नांचे तात्काळ निराकरण

जिल्हाधिकारी कार्यालयात पेंशन व पी.एफ. कार्यशाळा संपन्न;निवृत्तीवेतनधारकांच्या ११२ प्रश्नांपैकी ८० टक्के प्रश्नांचे तात्काळ निराकरण

चित्रफीत दालन

https://youtu.be/TzzuE2yX3DI

DISCLAIMER

सदर वेब न्यूज चॅनल हे संपूर्ण महाराष्ट्रात प्रसारित होते. या ऑनलाईन वेब न्यूज चॅनल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही.

Powered By Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय

Powered By Tech Drift Solutions.

whatsapp-logo