<
अकरावी आणि बारावीच्या परिक्षेनंतर ९ विद्यार्थ्यांनी आत्महत्या केली आहे. बुधवारी परिक्षेचा निकाल जाहीर झाला, त्यानंतर ही घटना घडली आहे. याव्यतिरिक्त आणखी दोन विद्यार्थ्यांनीही आत्महत्येचा प्रयत्न केला आहे.
ही घटना घडलीय आंध्र प्रदेशातया परिक्षेसाठी १० लाख विद्यार्थी बसले होते. अकरावीचे ६१ टक्के विद्यार्थी पास झाले, तर बारावीचे ७२ टक्के विद्यार्थी पास झाले आहे. एनडीटीव्हीने दिलेल्या वृत्तानुसार, श्रीकाकुलम जिल्ह्यात बी तरुण (१७) याने ट्रेनसमोर उडी मारून आत्महत्या केली. जिल्ह्य़ातील दांडू गोपालपुरम गावातील राहणारा इंटरमिजिएट प्रथम वर्षाचा विद्यार्थी बऱ्याचशा पेपरमध्ये नापास झाल्यामुळे तो निराश झाला होता.
मलकापुरम पोलीस ठाण्याच्या हद्दीतील त्रिनाधापुरम येथे एका १६ वर्षीय मुलीने तिच्या राहत्या घरी आत्महत्या केली. ती मूळची विशाखापट्टणम जिल्ह्यातील आहे. इंटरमिजिएट फर्स्ट इयरच्या काही विषयात नापास झाल्याने तिने हे पाऊल उचललं. भारतातील प्रीमियर कॉलेजेसमध्ये आत्महत्यांचे प्रमाण वाढत असताना ही धक्कादायक बातमी समोर आली आहे. इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी (IIT) च्या विविध कॅम्पसमध्ये या वर्षी चार विद्यार्थ्यांनी आत्महत्या केली आहे.