<
महाराष्ट्र दिन निमित्त तुम्हाला या गोष्टी घराबाहेर पडण्याआधी माहिती असायला हव्यात नाहीतर तुमचं नुकसान होऊ शकतं.1 मे रोजी महाराष्ट्र दिन निमित्त बँकांना सुट्टी असणार आहे. याशिवाय लाँग विकेण्ड आल्यामुळे ATM मध्ये देखील खडखडाट होण्याची शक्यता आहे. त्यामुळे पैशांची चणचण जाणवू शकते. पण ऑनलाईन सेवा सुरू असणार आहे. त्यामुळे तुमची छोटी कामं ऑनलाईन होऊ शकतात.या दिवशी शेअर मार्केटही बंद असणार आहे.
शनिवार, रविवारी आणि सोमवारी 1 मे येत असल्याने सलग तीन दिवस शेअर मार्केट बंद असणार आहे. त्यामुळे कोणतेही व्यवहार करता येणार नाहीत.तुम्हाला टॅक्स रिजिम निवडण्याची मुदत संपणार आहे. ज्यांनी निवडलं नाही त्यांना डिफॉल्ट नवीन रिजिम लागू होईल. याशिवाय स्पॅम कॉल, LPG सारख्या आवश्यक गोष्टींमध्ये देखील महत्त्वाचे बदल होणार आहेत. ते समजून घेणं आवश्यक आहे.
महाराष्ट्र दिनानिमित्त मुंबईत वाहतुकीत बदल करण्यात आले आहेत. मुंबई पोलिसांनी याबाबतची माहिती ट्विट करून दिली आहे. मोठे कार्यक्रम ज्या ज्या ठिकाणी आहेत त्या ठिकाणी वाहतूक कोंडी होऊ नये म्हणून वाहतुकीत बदल करण्यात आले आहेत.