<
जळगांव(प्रतिनिधी)- कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाच्या आजीवन अध्ययन व विस्तार विभागातर्फे विविध अभ्यासक्रम सुरू करण्यासाठी प्रस्ताव पाठविण्याचे आवाहन करण्यात आलेले आहे.या विभागाच्या संलग्नतेने विविध महाविद्यालये व मान्यताप्राप्त संस्था अशा २३ ठिकाणी कौशल्य आणि रोजगाराभिमूख ११४ प्रमाणपत्र अभ्यासक्रम सुरू आहेत. तसेच ५ ठिकाणी मार्गदर्शन व समूपदेशन पदव्यूत्तर आणि इतर विषयांवरील १६ पदविका अभ्यासक्रम सुरू आहेत.
शैक्षणिक वर्ष २०२३-२४ साठी जळगाव, धुळे, नंदुरबार जिल्ह्यात विविध महाविद्यालयांकडून प्रमाणपत्र व पदविका अभ्यासक्रम सुरू करण्यासाठी प्रस्ताव मागविण्यात येत आहेत. योग्य असलेल्या प्रस्तावाना मान्यता दिली जाईल. याबाबतची सर्व माहिती विद्यापीठाच्या संकेतस्थळावर देण्यात आली आहे. अशी माहिती या विभागाचे संचालक प्रा. डॉ. आशुतोष पाटील यांनी दिली आहे.