<
जळगांव- कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठातर्फे बहि:स्थ शिक्षण आणि अध्ययन विभागाद्वारे सुरू केलेल्या विविध प्रमाणपत्र अभ्यासक्रमांच्या ऑनलाईन प्रवेशाला १० मेपर्यंत मुदतवाढ दिली आहे.
या विभागाकडून मोडीलिपी या शिक्षणक्रमांसोबत लिंग संवेदनशीलता, सायबर गुन्हे आणि कायदे, बौद्धिक संपत्ती हक्क, मानसशास्त्रीय कसोट्या आणि मोजमाप, संशोधन पद्धतीची मूलतत्वे, संशोधनासाठी संबधित साहित्य आणि ग्रंथसूची लेखन, संशोधन प्रस्ताव लेखन, एसपीएसएसद्वारे संशोधन माहिती विश्लेषण, संशोधन अहवाल आणि पेपर प्रकाशन शिक्षणक्रम सुरू करण्यात आले आहेत.
या शिक्षणक्रमांची ऑनलाईन प्रवेशप्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. आता १० मेपर्यंत ऑनलाईन प्रवेश सुरू राहणार आहेत. ऑनलाईन प्रवेशासाठी https://nmu.ac.in/external-education/en-us/Programmes/Certificate-Program Click on Certificate Program link देण्यात आली आहे, अशी माहिती या विभागाच्या संचालक डॉ. मनीषा इंदाणी यांनी दिली.