<
मुंबई विद्यापीठाने नुकतीच अधिसूचना निर्गमित देखील केली आहे.
पदाचे नाव- संचालक (परीक्षा आणि मूल्यमापन मंडळ), संचालक (इनोव्हेशन इंक्युबॅशन आणि लिंकेज), मुख्य कार्यकारी अधिकारी अर्थातच सीईओ या तीन पदासाठी ही भरती राबवली जात आहे.
निवड पद्धती- या पदभरती अंतर्गत उमेदवाराची निवड ही थेट मुलाखतीद्वारे केली जाणार आहे. अर्थातच या पदांसाठी कोणतीही लेखी परीक्षा उमेदवारांची घेतली जाणार नाही.
अर्ज करण्याची पद्धत- उमेदवारांना अर्ज ऑनलाईन आणि ऑफलाईन अशा दोन्ही पद्धतीने करायचा आहे. म्हणजे ऑनलाईन अर्ज भरल्यानंतर सदर अर्जाची प्रत ही विद्यापीठात जमा करायची आहे. https://mu.ac.in/advertisement-of-variousposts या लिंक वर जाऊन इच्छुक आणि पात्र उमेदवार आपला अर्ज ऑनलाइन सादर करू शकतात आणि त्यानंतर अर्जाची प्रत विद्यापीठात जाऊन सबमिट करू शकतात.
अर्ज करण्याची मुदत- ऑनलाइन अर्ज 11 मे 2023 पर्यंत करता येणार आहेत. तसेच ऑफलाईन अर्जाची प्रत दिनांक 18 मे 2023 पर्यंत सादर करता येणार आहे.