ठाणे- भिवंडीतील बनावट टेलिफोन एक्सचेंजवर दहशतवाद विरोधी पथक आणि ठाणे पोलिसांनी छापा टाकला.ते इमारतीच्या पाचव्या मजल्यावर चालवले जात होते. एटीएस अधिकाऱ्यांनी येथे छापा टाकताच एकच खळबळ उडाली. अधिकाऱ्यांना पाहून एका व्यक्तीने इमारतीच्या पाचव्या मजल्यावरून उडी मारली आणि त्याचा मृत्यू झाला. बनावट टेलिफोन एक्सचेंज चालवल्याच्या आरोपावरून पोलिसांनी अनेकांना ताब्यात घेतले आहे.
अधिकाऱ्यांच्या म्हणण्यानुसार, गौरी पाडा येथील एका इमारतीत असेच काम सुरू असल्याची माहिती त्यांना मिळाली होती. पोलिसांपासून वाचण्यासाठी तरुणाने असे आत्महत्येचे पाऊल उचलल्याचे बोलले जात आहे. त्याचा मृतदेह पोस्टमॉर्टमसाठी पाठवण्यात आला आहे. ज्या फ्लॅटमध्ये बनावट टेलिफोन एक्सचेंज चालवले जात होते, त्या फ्लॅटच्या मालकाचा पोलीस आता शोध घेत असल्याचे सांगण्यात येत आहे. त्याच्या अटकेसाठी पोलीस आजूबाजूच्या भागात छापे टाकत आहेत.

पोलिसांनी फ्लॅटमधील सर्व वस्तू ताब्यात घेतल्या आहेत. आता त्यांची चौकशी केली जाईल. ज्या लोकांना ताब्यात घेतले आहे, पोलिस त्यांची चौकशी करत आहेत. यासोबतच मृत तरुणाची ओळख पटवण्यात येत आहे. तो कोठून आणि कधीपासून या प्रकारात सहभागी आहे, याचा शोध पोलीस घेत आहेत.