<
दिल्ली- जेव्हा जेव्हा शेअर बाजारातून मोठी कमाई करण्याचा विचार येतो तेव्हा वॉरन बफे, राकेश झुनझुनवाला आणि राधाकिशन दमानी यांसारख्या लोकांचा आवर्जून उल्लेख केला जातो.पण आजच्या युगात हैदराबादचा संकर्ष चंदाही या यादीत आपले स्थान निर्माण करण्यात यशस्वी ठरत आहे.संकर्ष अवघ्या 23 वर्षांचा आहे, ज्याने वयाच्या 17 व्या वर्षापासून शेअर बाजारात गुंतवणूक करण्यास सुरुवात केली होती. आजच्या काळात संकर्ष चंदा जवळपास 100 कोटी रुपयांचे मालक आहेत.
संकर्ष केवळ स्टॉक मार्केटमध्येच गुंतवणूक करत नाही, तर तो Savart अर्थात Svobodha Infinity Investment Advisors Private Limited नावाच्या फिनटेक स्टार्टअपचा संस्थापक देखील आहे. त्याचे स्टार्टअप लोकांना शेअर बाजार, म्युच्युअल फंड आणि बाँडमध्ये गुंतवणूक करण्यास मदत करते.2017 मध्ये त्याने आपले शिक्षण सोडले आणि 8 लाख रुपयांच्या गुंतवणुकीने 35 लोकांसह आपली कंपनी सुरू केली. तो बेनेट युनिव्हर्सिटी (ग्रेटर नोएडा) मधून B.Tech कॉम्प्युटर सायन्स करत होता, पण स्टॉक मार्केटमध्ये रस असल्यामुळे त्याने त्याचा अभ्यास अर्धवट सोडला.
हैदराबाद येथील शाळेतून 12वी उत्तीर्ण झाल्यानंतर संकर्षने 2016 मध्ये शेअर बाजारात गुंतवणूक करण्यास सुरुवात केली. त्याने फक्त 2,000 रुपये गुंतवायला सुरुवात केली आणि पुढच्या 2 वर्षात भरपूर पैसे कमावले. संकर्षने एका मुलाखतीत सांगितले होते की, त्याने अवघ्या 2 वर्षात स्टॉक मार्केटमध्ये सुमारे 1.5 लाख रुपये गुंतवले होते आणि दोन वर्षांत ते पैसे 13 लाख रुपये झाले.
कंपनी सुरू करण्यासाठी त्यांनी आठ लाखांचे शेअर्स विकून कंपनी सुरू केली.संकर्ष वयाने तरुण असेल, पण त्याचे काम अनुभवी गुंतवणूकदारासारखे आहे. 2016 मध्ये संकर्षने फायनान्शियल निर्वाण नावाचे पुस्तकही लिहिले. हे पुस्तक ट्रेडिंग आणि गुंतवणूक यातील फरक स्पष्ट करते. संकर्ष भलेही करोडपती झाला असेल, पण तो अतिशय साधे जीवन जगतो. तो बहुतेक वेळा टी-शर्ट आणि शॉर्ट्समध्ये राहतो. जेव्हा त्याला मीटिंग किंवा शोमध्ये जावे लागते तेव्हाच तो खास कपडे घालतो.