<
महिलांनी स्वावलंबी होणं स्वत:च्या पायावर उभं राहून घराला आर्थिक हातभार लावणं सध्याच्या काळात खूप गरजेचं आहे. काहीवेळा गाठीशी पैसे नसतात म्हणून व्यवसाय करता येत नाही मात्र कौशल्य असतं, अशा महिलांसाठी खास सरकार पुढे येऊन मदत करत आहे.
सुशिक्षित बेरोजगार व उद्योग सुरु करू इच्छिणाऱ्या तरुणांना स्वतःचा एखादा लघु उद्योग सुरु करता यावा या उद्देशाने मुख्यमंत्री रोजगार निर्मिति योजना सुरू करण्यात आली. यामध्ये महिलांना आणि तरुणां देखील व्यावसाय करण्यासाठी कर्ज घेता येतं.
महिलांसाठी खास या योजनेत 30 टक्के आरक्षण असल्याने अनेक महिलांना याचा फायदा मिळत आहे. छोटे छोटे उद्योग सुरू करून महिला सक्षम होत आहेत. यासाठी तुम्ही ऑनालईन अर्ज वेबसाईटवर जाऊन करू शकता. maha-cmegp.org.in या वेबसाईटवर जाऊन क्लिक करा. तर उद्योगीनी योजनेसाठी देखील तुम्ही ऑनलाईन अर्ज करू शकता.