<
कला, वाणिज्य व विज्ञान शाखेतील पदवी व पदव्युत्तर अभ्यासक्रमांना २०२३-२४ या शैक्षणिक वर्षापासून नवीन शैक्षणिक धोरण लागू करण्यात येत आहे. त्यादृष्टीने कर्मचाऱ्यांनी सज्ज राहावे, असे आवाहन कुलगुरू प्रा. डॉ. व्ही.एल. माहेश्वरी यांनी केले.
यासंदर्भात विद्यापीठातील शिक्षक, शिक्षकेतर अधिकारी व कर्मचाऱ्यांना मार्गदर्शन करण्यात आले. या वेळी प्र-कुलगुरू प्रा. एस. टी. इंगळे, कुलसचिव डॉ. विनोद पाटील, अधिष्ठाता प्रा. अनिल डोंगरे उपस्थित होते. कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठात नवीन शैक्षणिक धोरणातील महत्त्वाचे टप्पे व संपूर्ण आराखडा, शासनाचे परिपत्रक यासंदर्भातील माहिती कुलगुरूंनी सादर केली.