एप्रिल 2023 मध्ये देशातील बेरोजगारीचा दर चार महिन्यांच्या उच्चांकावर पोहोचला आहे. मात्र, शहरी भागाच्या तुलनेत ग्रामीण भागात बेरोजगारीचे प्रमाण कमी झाले आहे.सेंटर फॉर मॉनिटरिंग इंडियन इकॉनॉमी (CMIE) च्या ताज्या आकडेवारीनुसार, एप्रिलमध्ये आशियातील तिसऱ्या सर्वात मोठ्या अर्थव्यवस्थेमध्ये बेरोजगारीचा दर 8.11 टक्क्यांवर पोहोचला आहे.
डिसेंबर 2022 नंतरचा हा सर्वोत जास्त बेरोजगारीचा दर आहे. त्यावेळी बेरोजगारीचा दर 8.11 टक्के होता, तर मार्च 2023 मध्ये तो 7.8 टक्के होता.आकडेवारीनुसार, गेल्या महिन्यात शहरी भागातील बेरोजगारीचा दर 9.81 टक्क्यांवर पोहोचला आहे. मार्च 2023 मध्ये तो 8.51 टक्के होता. ग्रामीण भागात हा दर मार्च 2023 मधील 7.47 टक्क्यांवरून एप्रिलमध्ये 7.34 टक्क्यांवर घसरला.CMIE ने सांगितले की देशात जितक्या नोकऱ्या उपलब्ध आहेत त्यापेक्षा जास्त लोक श्रमशक्तीचा भाग बनत आहेत. कामगार सहभाग वाढल्याने बेरोजगारीच्या दरात वाढ झाली आहे.