मुंबई- राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी राजीनामा दिल्यामुळे राजकारणात खळबळ उडाली असून नवीन अध्यक्ष कोण होणार याची चर्चा रंगली आहे. पण, आता खासदार सुप्रिया सुळे यांच्या नावाची चर्चा आघाडीवर आहे.आजच्या बैठकीमध्ये सुप्रिया सुळे यांच्या नावाची चर्चा झाली अशी माहिती खुद्द प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी दिली आहे.
राष्ट्रवादीची आज सकाळी महत्त्वाची बैठक पार पडली. या बैठकीला राष्ट्रवादी सगळेच नेते हजर होते. पवार यांनी जी समिती नेमली होती त्या समितीची ही बैठक होती.या बैठकीनंतर जयंत पाटील यांनी माध्यमांच्या प्रतिनिधींशी संवाद साधला. पवार साहेबांच्या नेतृत्वामुळे देशात पक्ष वाढला आहे.
देशभरात कार्यकर्ते हे त्यांच्या नावामुळे जोडले आहे. महाराष्ट्रातील कार्यकर्त्यांच्या मनात वेगळा विचार येणार नाही.पवार साहेबांनीच अध्यक्षपदी राहावं अशी सर्वांची मागणी आहे. देशभरात राष्ट्रवादी वाढवण्यासाठी आणि चर्चेसाठी शरद पवार साहेबांची गरज आहे, असंही जयंत पाटील म्हणाले.