<
सरकारी बँका आठवड्यातून फक्त 5 दिवस काम करतील. याचा अर्थ सार्वजनिक क्षेत्रातील बँकांच्या कर्मचाऱ्यांना आठवड्यातून दोन दिवस सुट्टी मिळणार आहे. अर्थ मंत्रालय लवकरच अधिसूचना जारी करून त्याला मान्यता देऊ शकते.अनेक दिवसांपासून सरकारी बँकेचे कर्मचारी ही मागणी करत होते.
सीएनबीसी आवाजच्या वृत्तानुसार, बँकांच्या या मागणीवर इंडियन बँक्स असोसिएशनने सरकारला प्रस्ताव पाठवला होता. आता लवकरच वेतन मंडळ सुधारणेसह अधिसूचना जारी केली जाऊ शकते. सध्या सार्वजनिक क्षेत्रातील बँकांना दुसऱ्या आणि चौथ्या आठवड्यात शनिवार आणि रविवार असे दोन दिवस सुट्टी आहे.