<
प्रधानमंत्री मातृवंदना योजनेचा ( PMMVY ) उद्देश्य महिलांचे आरोग्य सुधारून त्यांच्यातील कुपोषण दूर करणे, त्यांना योग्य उपचार आणि औषधांचा खर्च देणे हा आहे. पीएम मातृ वंदना योजनेत प्रेग्नंट आणि स्तनदा मातांना पाच हजार रूपये रोख दिले जातात.या पाच हजार रूपये तीन हप्त्यात डीबीटीद्वारे महिलांच्या खात्यात वळते केले जाते.
प्रेग्नंट महिलांना या योजनेत रजिस्ट्रेशन करताना 1000 रुपयांचा पहिला हप्ता दिला जातो. सहाव्या महिन्यात किमान एका तपासणीनंतर २००० रूपयांचा दुसरा हप्ता मिळतो. तिसऱ्यांदा बाळाच्या जन्मानंतर रजिस्ट्रेशन झाल्यावर 2000 रूपयांचा शेवटचा हप्ता दिला जातो.केंद्र सरकारची PMMVY योजना भारतातील महिलांच्या आरोग्यासाठी फायदेशी ठरली आहे.
या योजनेमुळे गरोदर स्त्रिया आणि स्तनदा मातांना आरोग्य उपचार आणि सुविधा उपलब्ध होत आहेत, त्यामुळे कुपोषित मातांना फायदा होत असून त्यांचे प्रमाण कमी होण्यास मदत होत आहे. तसेच त्यांच्या आरोग्यामध्ये लक्षणीय सुधारणा झाली आहे. या योजनेद्वारे दिल्या जाणाऱ्या आर्थिक मदतीमुळे गर्भवती महिला आणि त्यांच्या कुटुंबीयांची आर्थिक चिंता दूर झाली आहे. यामुळे महिलांना त्यांच्या आरोग्याकडे लक्ष द्यायला वेळ मिळत आहे.