<
जळगाव – (प्रतिनिधी) – सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था बार्टी, पुणे-जिल्हा जळगाव व सहा. आयुक्त समाज कल्याण कार्यालय जळगाव यांच्या संयुक्त विद्यमाने तथागत गौतम बुद्ध पौर्णिमा निमित्ताने “स्वयं सहाय्यता युवा गट उद्योजकता प्रशिक्षण कार्यशाळा” आयोजित करण्यात आलेली होती. सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाचे सहा. आयुक्त श्री.योगेश पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली सदरील कार्यशाळा संपन्न झाली.
कार्यशाळेच्या सुरुवातीला जगाला शांतीचा संदेश देणाऱ्या, महाकरूणी तथागत भगवान गौतम बुद्ध यांच्या प्रतिमेला पुष्प अर्पण करून विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास मान्यवरांकडून माल्यार्पण करून अभिवादन करण्यात आले तदनंतर कार्यशाळेचे प्रास्ताविक श्री. युनुस तडवी (प्रकल्प अधिकारी, बार्टी) यांनी केले त्यानंतर सर्व मान्यवरांचे स्वागत करण्यात आले.
सदरील कार्यक्रमाचे अध्यक्ष मा.अरूण कुमार सिंह (संचालक, सेन्ट ग्रामीण स्वयंरोजगार प्रशिक्षण संस्था R-SETI जळगाव) होते. कार्यशाळेचे प्रमुख पाहुणे मा.माधव धकाते (संचालक, सेन्ट ग्रामीण स्वयंरोजगार प्रशिक्षण संस्था R-SETI जळगाव) हे होते, कार्यशाळेचे प्रमुख मार्गदर्शक मा. विजय सैंदाणे (कार्यक्रम समन्वयक, महाराष्ट्र उद्योजकता विकास केंद्र-जिल्हा उद्योग केंद्र जळगाव) व मा. श्रृती चौधरी (कार्यक्रम समन्वयक, पंडित दिन-दयाल उपाध्याय कौशल्य विकास योजना, जळगाव) यांनी विविध प्रकारच्या प्रशिक्षणासंदर्भात मार्गदर्शन करत स्वयं सहाय्यता युवाटातील सदस्यांना R-SETI, उद्योजकता विकास केंद्र-जिल्हा उद्योग केंद्र, पंडीत दिन-दयाल उपाध्याय योजने अंतर्गत विविध प्रशिक्षणास बार्टीतील स्वयं सहाय्यता युवा गट सदस्यांना प्राधान्यक्रम दिले जाईल असे आश्वासित केले. यानंतर मा. राहुल संदानशिव (प्रशिक्षक- सेंट ग्रामीण स्वयंरोजगार प्रशिक्षण संस्था R-SETI) यांनी R-SETI मार्फत चालविल्या जाणाऱ्या विविध प्रशिक्षणासंदर्भात सविस्तर माहिती दिली त्यानंतर मा.देवेंद्र महाजन सर (प्रशिक्षक-जिल्हा ग्रामीण स्वयंरोजगार प्रशिक्षण संस्था R-SETI), मा.सुवर्णा होले ऋ(कार्यक्रम समन्वयक, पंडित दिन-दयाल उपाध्याय कौशल्य विकास योजना, जळगाव) तसेच बार्टी व समाज कल्याण विभागाच्या विविध योजनांची सविस्तर माहिती समतादूत सविता चिमकर यांनी विविध प्रशिक्षणासाठी युवागट सदस्यांनी सहभागी होण्यासाठी आवाहन केले व विविध प्रशिक्षणांची माहिती देत मार्गदर्शन केले.
सदरील कार्यक्रमासाठी आसोदा गावाचे ग्रामपंचायत सदस्य मा. महेंद्र जोहरे, जितेंद्र बिऱ्हाडे, दिपक बिऱ्हाडे, श्रीकांत बिऱ्हाडे, राकेश सुर्यवंशी यांनी परिश्रम घेतले व बहुसंख्येने महिला उपस्थित होते. सदरील कार्यशाळेचे सुत्रसंचलन समतादूत सविता चिमकर यांनी केले तर आभार सरला गाढे यांनी मानले.