Monday, June 15, 2026
सत्यमेव जयते
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
सत्यमेव जयते
No Result
View All Result

राज्य शासकीय कर्मचाऱ्यांसाठी 2 महत्वाचे शासन निर्णय जारी

Team Satymev Jayate by Team Satymev Jayate
07/05/2023
in राज्य
Reading Time: 1 min read
राज्य शासकीय कर्मचाऱ्यांसाठी 2 महत्वाचे शासन निर्णय जारी

राज्य कर्मचाऱ्यांसाठी एक अतिशय महत्त्वाची बातमी समोर येत आहे. जसं की आपणास ठाऊकच आहे की गेल्या काही दिवसांपूर्वी राज्य शासनाने के पी बक्षी समितीच्या शिफारशी स्वीकृत केल्या होत्या.यानुसार आता राज्यातील विविध संवर्गातील कर्मचाऱ्यांच्या वेतन श्रेणीमध्ये सुधारणा केल्या जाणार आहेत.

या पार्श्वभूमीवर वेतन सुधारणा करण्यासाठी आता शासन निर्णय देखील निर्गमित होऊ लागले आहेत. यामध्ये नुकतेच 4 मे 2023 रोजी राज्य कर्मचाऱ्यांसंदर्भात दोन अतिशय महत्त्वाचे शासन निर्णय निर्गमित झाले आहेत.

या कर्मचाऱ्यांच्या वेतनश्रेणीत झाली सुधारणा:- चार मे रोजी जारी झालेल्या एका शासन निर्णयानुसार राज्यातील माध्यमिक शाळा सोबत संलग्न नसलेल्या कनिष्ठ महाविद्यालयातील मुख्याध्यापक पदावर कार्यरत असलेल्या कर्मचाऱ्यांना आता सुधारित वेतन श्रेणी लागू झाली आहे.

आता या स्वतंत्र कनिष्ठ महाविद्यालयातील मुख्याध्यापकांना ४७६००-१५११०० ही वेतनश्रेणी लागू होणार आहे. आतापर्यंत या मुख्याध्यापकांना इतर उच्च माध्यमिक प्रमाणे ४४९००-१४२४०० या वेतनश्रेणीनुसार वेतन मिळत होतं.निश्चितच, या वंचित मुख्याध्यापकांना वेतनश्रेणीत सुधारणा देऊन या कर्मचाऱ्यांना दिलासा देण्याचे काम झाले आहे.

या सुधारित वेतन श्रेणीचा लाभ मात्र मुख्याध्यापक पदव्युत्तर पदवीधर व बी.एड असेल तरच दिला जाणार असल्याचे शासन निर्णयात नमूद करण्यात आले आहे.या शिवाय तबलजी या पदावर कार्यरत असलेल्या कर्मचाऱ्यांना सुद्धा आता नवीन वेतनश्रेणी बहाल करण्यात आली आहे. यानुसार आता तबलजी पदावर कार्यरत असलेल्या कर्मचाऱ्यांना २५५०० – ८११०० अशी सुधारित श्रेणी लागू केली जाणार आहे. निश्चितच या कर्मचाऱ्यांसाठी देखील हा निर्णय दिलासादायक राहणार आहे.

याव्यतिरिक्त आणखी एक शासन निर्णय चार मे रोजी काढण्यात आला आहे. हा शासन निर्णय राज्यातील अकृषी विद्यापीठातील शिक्षकेतर कर्मचाऱ्यांसंदर्भात आहे. यानुसार राज्यातील अकृषी विद्यापीठातील शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांना आता सातवा वेतन आयोगानुसार थकबाकी मिळणार आहे.

उच्च व तंत्र शिक्षण विभागांकडून हा जीआर म्हणजे शासन निर्णय काढण्यात आला आहे.या जीआर मध्ये दिलेल्या माहितीनुसार आता राज्यातील अकृषी विद्यापीठातील शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांना दि.01 जानेवारी 2016 ते दि.31 ऑक्टोंबर 2020 या कालावधीमधील सातवा वेतन आयोगाची थकबाकी मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. कारण की यासाठी राज्य शासनाने या शासन निर्णयाअन्वये मंजुरी दिली आहे.

Team Satymev Jayate

Previous Post

पासपोर्ट संदर्भात हायकोर्टाने प्रशासनाला नियम 12 नुसार दिले ‘हे’ सक्त आदेश

Next Post

महा-डीबीटी पोर्टलवर अर्ज करण्याची सुविधा २४ तास उपलब्ध

Next Post
शेतकऱ्यांना दिलासा! आता एकाच ठिकाणी घेता येणार सर्व योजनांचा लाभ

महा-डीबीटी पोर्टलवर अर्ज करण्याची सुविधा २४ तास उपलब्ध

जैन इरिगेशन-गांधी तिर्थ, जळगाव

FOLLOW

ताज्या बातम्या

एल-निनोच्या पार्श्वभूमीवर पाणीसाठा जपून वापरण्याचे राज्य शासनाचे निर्देश

एल-निनोच्या पार्श्वभूमीवर पाणीसाठा जपून वापरण्याचे राज्य शासनाचे निर्देश

विकसित महाराष्ट्र -२०४७ साठी शिक्षण, आरोग्य, कौशल्य विकास, महिला सक्षमीकरणासह सर्वसमावेशक मानवी विकासासाठी राज्याचे विशेष  प्रयत्न- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

विकसित महाराष्ट्र -२०४७ साठी शिक्षण, आरोग्य, कौशल्य विकास, महिला सक्षमीकरणासह सर्वसमावेशक मानवी विकासासाठी राज्याचे विशेष  प्रयत्न- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

जिल्हाधिकाऱ्यांनी घेतला पाचोरा तालुकास्तरीय सर्व विभागांचा कामकाज आढावा;प्रलंबित प्रश्न तात्काळ सोडविण्याचे निर्देश

जिल्हाधिकाऱ्यांनी घेतला पाचोरा तालुकास्तरीय सर्व विभागांचा कामकाज आढावा;प्रलंबित प्रश्न तात्काळ सोडविण्याचे निर्देश

जनसमाधान बैठकीतील अर्जदारांच्या विविध विषयांच्या समस्या तात्काळ सोडवा – जिल्हाधिकारी रोहन घुगे

जनसमाधान बैठकीतील अर्जदारांच्या विविध विषयांच्या समस्या तात्काळ सोडवा – जिल्हाधिकारी रोहन घुगे

जिल्ह्यात १०वी व १२ वीच्या पुरवणी परीक्षा १६ जूनपासून जिल्हाधिकारी यांनी घेतला पुर्व तयारीचा आढावा

जिल्ह्यात १०वी व १२ वीच्या पुरवणी परीक्षा १६ जूनपासून जिल्हाधिकारी यांनी घेतला पुर्व तयारीचा आढावा

चित्रफीत दालन

https://youtu.be/TzzuE2yX3DI

DISCLAIMER

सदर वेब न्यूज चॅनल हे संपूर्ण महाराष्ट्रात प्रसारित होते. या ऑनलाईन वेब न्यूज चॅनल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही.

Powered By Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय

Powered By Tech Drift Solutions.

whatsapp-logo