<
भारत आता जगातील सर्वाधिक लोकसंख्या असलेला देश बनला आहे. भारताने लोकसंख्येच्या बाबतीत अव्वल असणाऱ्या चीनला मागे टाकलं आहे.युनायटेड नेशन्स पॉप्युलेशन फंडच्या अहवालानुसार, भारत-चीनमध्ये जगाच्या एकूण लोकसंख्येपेक्षा एक तृतीयांश लोक आहेत.
या अहवालानुसार भारताची लोकसंख्या 142.86 कोटी झाली असून चीनची 142.57 कोटी नोंदवण्यात आली आहे. तर जगाची लोकसंख्या आता 8 अब्जांच्या पुढे गेली आहे. भारताचा प्रजनन दर सरासरी 2.0 नोंदवण्यात आला आहे, तर सरासरी आर्युमान पुरुषांसाठी 71 वय तर महिलांसाठी 74 वय आहे.