<
जळगाव-( प्रतिनिधी) – महाराष्ट्र शासनाच्या पर्यटन व सांस्कृतिक विभाग च्या वतीने राज्याच्या रंगभूमी प्रयोग परिनिरीक्षण मंडळाची पुनर्रचना नुकतीच करण्यात आली असुन जेष्ट नाट्य व चित्रपट अभिनेता विजय गोखले याची अध्यक्ष पदी निवडी करण्यात आली आहे राज्याभरातुन विविध जिल्ह्यातील 36 अशासकीय सद्स यांची या मंडळावर निवड करण्यात आली असुन त्या संबधीत नुकताच शासन निर्णय काढण्यात आला आहे
खानदेशातील सुप्रसिद्ध शाहीर व नाट्य, पथनाट्य कलावंत तसेच खानदेश लोककलावंत विकास प्रतिष्ठानचे अध्यक्ष श्री विनोद दिगंबर ढगे यांची या मंडळावर नियुक्ती करण्यात आली असुन त्यांच्या नियुक्तीने खानदेशातील लोककलावंता मिळालेला एक विशेष बहुमान आहे
खान्देशातील जळगाव व धुळे विभागातुन जळगाव जिल्ह्यासाठी नाट्यकर्मी विश्वनाथ निळे यांची तर धुळे जिल्ह्यासाठी विनोद ढगे यांची या मंडळावर निवड करण्यात आली
जळगाव व धुळे येथील हौशी नाट्य कर्मी यांना नाट्य सादरीकरणात येणा-या विविध अडचणी स्थानिक स्तरावच सोडविण्याच्या दृष्टीने आपण प्रयत्न करणार असुन
खानदेशातील लोप पावत चाललेल्या लोककला मौखिक परंपरा शाहीर ,तमाशा, गोंधळ, वाघ्या मुरळी, भारुड ,लोक गिते आदि लोक साहित्य फारशे प्रकाशित स्वरुपात नाही तथा या लोककलावंता जवळ असलेल्या लोककला लोकसाहीत्याला शासनाच्या या मंडळाच्या माध्यमातून परिनिरीक्षण करून त्याचा संचित ठेवा जतन व संवर्धन करून लोककलेच्या क्षेत्रात कार्यरत युवा पिढीला कसा होईल या साठी प्रयत्न करणार असल्याचे विनोद ढगे यांनी सांगितले
विनोद ढगे यांच्या नियुक्ती बद्दल सांस्कृतिक क्षेत्रातील विविध मान्यवराकडून त्यांचे अभिनंदन करण्यात येत आहे.