रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया म्हणजेच RBI ही भारत सरकारचीही बँक आहे. त्यामुळे मध्यवर्ती बँकेच्या उत्पन्नामध्ये केंद्र सरकारचाही वाटा असतो.
या वर्षी सरकारला केंद्रीय बँके कडून एकूण 80000 कोटी रुपयांची कमाई होणार आहे, जी सरकारच्या अंदाजपत्रकापेक्षा दुप्पट असू शकते. या वर्षी परकीय चलनाच्या व्यवहारातून आरबीआयला खूप मोठा नफा झाला आहे. रेपो दरात सातत्याने होत असलेल्या वाढीमुळे मध्यवर्ती बँकेसह स्थानिक बँकांचे उत्पन्न वाढले आहे.
त्यामुळे मध्यवर्ती बँकेचा नफा वाढला आहे, ज्यामुळे ती सरकारला सुमारे 80000 कोटी रुपयांचा लाभांश देऊ शकते.आयडीएफसी फर्स्ट बँकेतील अर्थतज्ज्ञ गौरा सेनगुप्ता म्हणतात की, या वर्षी आरबीआयचा लाभांश बजेट अंदाजापेक्षा जास्त असू शकतो. ते 70,000 ते 80000 कोटींच्या दरम्यान अपेक्षित आहे. केंद्रीय बँकेने 2021-22 या आर्थिक वर्षात केंद्र सरकारकडे 30307 कोटी रुपये सरप्लस म्हणून हस्तांतरित केले होते.
यंदा 2022-23 आर्थिक वर्षात एप्रिल ते फेब्रुवारी दरम्यान आरबीआयने 206 अब्ज डॉलरचा विक्रमी विदेशी चलन व्यवहार केला होता. मागील आर्थिक वर्षात ते केवळ 96 अब्ज डॉलर होता”, असं ते म्हणाले.