<
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सरकारने सत्तेवर आल्यावर राज्यातील जनतेच्या हिताचे घेतलेले निर्णय जनतेपर्यंत पोहोचवण्यासाठी जाहिरातीच्या माध्यमातून महिनाभराच्या कालावधीत सरकारतर्फे माहिती व जनसंचालनालय विभाग प्रयत्न करणार आहे.
या उपक्रमात वर्तमानपत्रे ,दूरचित्रवाहिन्या, रेडिओ, समाजमाध्यमे तसेच नवमाध्यमे यांच्या माध्यमातून जाहिरात करण्यासाठी 52 कोटी 90 लाख 80 हजार 240 रुपयांच्या खर्चास माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाने वित्तीय व प्रशासकीय मान्यता दिली आहे.
यावेळी महसूलमंत्री राधाकृष्ण विखेपाटील बोलताना म्हणाले की, शासन आपल्या दारी’या उपक्रमात भाजप पदाधिकाऱ्यांना नियोजनात सहभागी करून घ्या, तसेच योजनांची माहिती पोहचविताना पंतप्रधान नरेंद्र मोदी, मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्र्यांचे छायाचित्र असणारी पत्रके काढा, प्रत्येक प्रभागात व गावात पोहचताना भाजप कार्यकर्ते बरोबर ठेवा, कोणी या कार्यक्रमास आक्षेप घेतला तर त्याला माझे नाव सांगा, असे म्हणत महसूल मंत्री राधाकृष्ण विखे यांनी शासकीय कामातून भाजपच्या प्रचाराची आखणी केली.