<
नागरिकांनी कापडी पिशवीचा वापर करावा- फिरोज शेख
जळगांव(प्रतिनिधी)- शासनाच्या नेहरू युवा केंद्र भारत सरकार संलग्न मौलाना आझाद अल्पसंख्याक फाऊंडेशन तर्फे जळगाव शहरातील मुख्य बाजारपेठ सुभाष चौकात ५०० कापडी पिशव्या वाटप केले. तसेच या उपक्रमात चौबे शाळेतील विद्यार्थ्यांनी उत्सुकतेने सहभाग नोंदवला. शासनाच्या प्लास्टिक मुक्त अभियान या अंतर्गत जिल्हाधिकारी डॉ अविनाश ढाकणे यांच्या आवाहनाला प्रतिसाद देत जळगांव शहरात विविध ठिकाणी बस स्टँड, आठवडे बाजार, फुले मार्केट, सुभाष चौक या ठिकाणी संस्थेच्या वतीने नागरिकांना कापडी पिशव्या वाटप करण्यात आल्या. २१ सप्टेंबर ते २ आँक्टोबर महात्मा गांधी जयंतीचे औचित्य साधत या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले. “स्वच्छता ही सेवा” अंतर्गत प्लास्टिक मुक्त अभियानास अल्प स्वरुपात हातभार लावण्यासाठी मौलाना आझाद अल्पसंख्याक फाऊंडेशनच्या माध्यमातून जळगांव शहरात ५०० कापडी पिशव्या वाटप करण्यात आल्या. संस्था अध्यक्ष फिरोज शेख यांनी वर्षभरात १० हजार कापडी पिशव्या जळगांव शहरात वाटप करण्याच्या संकल्प डोळ्यासमोर ठेवून या उपक्रमाची सुरुवात केली. शहरात प्रत्येक नागरिकाने विचार केला की कापडी पिशवीचा वापर करावा तर नक्कीच काही दिवसात जळगांव शहर प्लास्टिक मुक्त होईल असे मत फिरोज शेख यांनी यावेळी व्यक्त केले.
या उपक्रमात संस्था अध्यक्ष फिरोज शेख यांच्यासह सलीम इनामदार, अमित माळी, निशा पवार, चौबे शाळेच्या मुख्याध्यापिका सौ. वाणी मॅडम, चेतन निंबोळकर, गणेश जोशी, योगेश पाटील आदी उपस्थित होते.