<
दहावी नंतरच्या प्रथम वर्ष अभियांत्रिकी पदविका अभ्यासक्रमांच्या शैक्षणिक वर्ष २०२३-२४साठी प्रवेशास सुरुवात होणार आहे.
प्रवेश प्रक्रिया अधिक सुलभ आणि सोपी होण्यासाठी तंत्रशिक्षण विभागाने संकेतस्थळ विकसित केले असून, यंदा केंद्रीभूत प्रवेश प्रक्रिया मोबाइल ॲपवरही उपलब्ध होणार आहे.उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते संकेतस्थळाचे उद्घाटन करण्यात आले. उच्च व तंत्रशिक्षण विभागाचे प्रधान सचिव विकासचंद्र रस्तोगी, तंत्रशिक्षण संचालक विनोद मोहितकर आदी या वेळी उपस्थित होते.
पदविका अभ्यासक्रम प्रवेशासाठी अर्ज ,ऑनलाईन नोंदणी कागदपत्रांच्या स्कॅन, छायाप्रती अपलोड करणे, कागदपत्रे पडताळणी, अर्ज करणे ही प्रक्रिया १ जूनपासून सुरू करण्यात आली आहे. तंत्रशिक्षण संचालनालयाद्वारे कागदपत्रांच्या प्रत्यक्ष छाननी प्रक्रिये व्यतिरिक्त ऑनलाइन पडताळणीची संकल्पना राबवण्यात येणार आहे.
पाटील म्हणाले, की राज्यातील पदविका अभ्यासक्रमांच्या प्रवेशांना विद्यार्थ्यांचा गेल्या चार वर्षांपासून चांगला प्रतिसाद मिळत आहे. कमी कालावधीत रोजगारक्षम होण्यासाठी पदविका एक उत्तम पर्याय ठरत आहे. तंत्रशिक्षण संचालनालयाद्वारे रोजगाराभिमुख तांत्रिक शिक्षण देण्यासाठी, तसेच प्रवेश वाढविण्यासाठी विविध उपक्रम राबवले जात आहेत.
औद्योगिक क्षेत्राच्या गरजा आणि भविष्यातील संधींचा वेध घेऊन नऊ शासकीय, तीस विनानुदानित संस्थामध्ये दोन हजार ४६० प्रवेश क्षमतेचे उदयोन्मुख तंत्रज्ञानाचे अभ्यासक्रम सुरू करण्यात आले आहेत.
त्यामध्ये आर्टिफिशियल इंटेलिजन्स, मशीन लर्निंग, मॅकेट्रॉनिक्स, रोबोटिक्स, क्लाऊड कम्प्युटिंग अशा अभ्यासक्रमांचा समावेश आहे. अधिक माहिती https://dte.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध आहे.पदविका प्रवेश प्रक्रियेची वैशिष्ट्ये:- दहावी नंतरच्या प्रथम वर्ष पदविका अभ्यासक्रमास विद्यार्थ्यांच्या सोयीसाठी दहावीचा निकाल घोषित होण्यापूर्वी प्रवेश प्रक्रियेसाठी अर्ज भरण्याची सुविधा