<
तुम्हीही तलाठी भरतीची तयारी करत असाल तर तुमच्यासाठी एक आनंदाची बातमी आहे. ती म्हणजेच राज्यातील तब्बल 4 हजार 625 जागांची तलाठी पदासाठीची मेगाभरती केली जाणार असून यासंदर्भात राज्य सरकारने आदेश देखील काढले आहेत.
राज्य सरकारच्या महसूल आणि वन विभागाकडून आदेश निर्गमित करण्यात आलेले असून त्यामध्ये महाराष्ट्र सरकारच्या महसूल विभागाअंतर्गत तलाठी (गटज्ञक) संवर्गातील तब्बल 4 हजार 625 पदांच्या सरळसेवा भरती करिता राज्यातील 36 जिल्ह्यात ऑनलाइन पध्दतीने परीक्षा घेण्यात येणार आहे. ही परीक्षा दि. 17 ऑगस्ट ते 12 सप्टेंबर दरम्यान होणार असल्याचे देखील आदेशात नमुद करण्यात आलेले आहे.
पदसंख्या आणि आरक्षणामध्ये शासनाच्या संबंधित विभागांच्या सूचनेनुसार बदल (कमी-जास्त) होण्याची शक्यता आहे. त्यामुळे पदसंख्या आणि आरक्षणामध्ये बदल झाल्यास याबाबतची घोषणा, सूचना वेळोवेळी कार्यालयाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात येईल. संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आलेल्या सूचनांच्या आधारे प्रस्तुत परीक्षेमधून भरावयाच्या पदाकरीता भरती प्रक्रिया राबविण्यात येईल.