<
आंध्र प्रदेशात एक धक्कादायक घटना समोर आली आहे. जिथे, एक आई तिच्या अल्पवयीन मुलीला बळजबरीने हार्मोन्सच्या गोळ्या खाऊ घालत होती, जेणेकरून ती पटकन सुंदर आणि तरुण दिसावी आणि तिला चित्रपटात काम करता येईल.
राज्य बाल हक्क संरक्षण आयोगाने विजयनगरम येथील एका घरावर छापा टाकून अल्पवयीन मुलीची सुटका केली तेव्हा ही बाब उघडकीस आली.TOI च्या रिपोर्टनुसार, अल्पवयीन मुलीचे वय 16 वर्षे आहे. ती लवकर तरुण आणि सुंदर दिसावी यासाठी तीची आई तीला गेल्या चार वर्षांपासून हार्मोन्सच्या गोळ्या देत होती. गुरुवारी गोळ्या घेत असताना वेदना सहन न झाल्याने तिने चाइल्ड लाईनवर तक्रार दाखल केली. यानंतर बाल संरक्षण आयोगाने मुलीची सुटका केली.
अल्पवयीन मुलगी इयत्ता 11वीमध्ये शिकत आहे. तिने आयोगाकडे केलेल्या तक्रारीत म्हटले आहे की, माझी आई मला शरीराच्या वाढीला गती देण्यासाठी काही गोळ्या देत होती. जेव्हा मी आईने दिलेल्या गोळ्या खाते तेव्हा मी बेहोश होते आणि दुसऱ्या दिवशी माझे शरीर फुगते.यामुळे मला अडचणींचा सामना करावा लागत असून अभ्यासातही अडचणींचा सामना करावा लागत आहे.
तक्रारीत आपल्या व्यथा सांगताना अल्पवयीन मुलीने सांगितले की, तिची आई चित्रपट दिग्दर्शक म्हणून तिच्या घरी येणा-या लोकांशी संबंध ठेवण्यासाठी जबरदस्ती करते तिला माझ्यामार्फत चित्रपट दिग्दर्शक आणि निर्मात्यांकडून कमिटमेंट घ्यायची होती. जेव्हा मी गोळ्या घेण्यास नकार देत असे तेव्हा आई तिचा छळ करत असे तर कधी विजेचा धक्का देत असे, असे मुलीने तक्रारीत म्हटले आहे.
मुलीचे वडील राजेश कुमार यांनी तिच्या आईला घटस्फोट दिल्याचे तपासात समोर आले आहे. यानंतर तिच्या आईने दुसरे लग्न केले, काही वर्षांनी तीचाही मृत्यू झाला. तरूणीने 112 वर डायल करून मदत मागितली होती मात्र तिला काहीच मदत मिळाली नाही. यानंतर त्यांनी दुसऱ्या व्यक्तीच्या मदतीने मुलाला १०९८ क्रमांकावर फोन करून मदत मागितली.