<
जळगाव-(प्रतिनिधी) – पाळधी येथे दि.१५ जून २०२३ रोजी इम्पिरियल इंटरनॅशनल स्कूल मध्ये
शाळेच्या पहिल्या दिवशी विद्यार्थ्यांच्या छोट्या पावलांच्या आगमनाने स्कूल कॅम्पस पुन्हा बहरला.
उन्हाळ्याच्या सुट्ट्या संपल्यानंतर तब्बल दोन महिन्यांच्या कालावधीनंतर पहिल्याच दिवशी इम्पिरियल स्कूलमध्ये विद्यार्थी दाखल झालेत. शाळेच्या आवारात जल्लोषाचे वातावरण निर्माण झाले होते .उपस्थित सर्व विद्यार्थ्यांचे स्कूलचे शिक्षक व कर्मचाऱ्यांनी जल्लोषात स्वागत केले .शाळेतील विद्यार्थ्यांचे रिबिन कापून स्वागत समारंभाने आगमन झाले.
यावेळी विद्यार्थ्यांना चॉकलेट व बिस्कीट देण्यात आले. यावेळी शाळेच्या प्रांगणात विद्यार्थ्यांची रॅली काढण्यात आली. त्याचा विद्यार्थ्यांनी मनमुरादपणे आनंद लुटला.
विद्यार्थ्यांनी सादर केलेली गाणी, संगीत आणि नृत्याने शाळेच्या वातावरणात जत्रेचे स्वरूप प्राप्त झाले होते. यावेळी संचालक श्री. नरेश चौधरी यांच्या शुभहस्ते हस्ते शारदा मातेच्या छायाचित्रास फुलहार अर्पण करून पूजन करण्यात आले. प्रसंगी मुख्याध्यापिका परविन खान, शाळेचे शिक्षक, कर्मचारी व विद्यार्थी यांच्यासह त्यांचे पालकही उपस्थित होते.