
जळगाव – (प्रतिनिधी) – येथील लोकसेवक मधुकरराव चौधरी समाजकार्य महाविद्यालय जळगांव येथील प्रोफेसर डॉ उमेश वाणी यांची चार विद्यापीठांमध्ये अभ्यास मंडळावर निवड झाली आहे.
१)राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठ, २)कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ जळगाव, ३)गोंडवाना विद्यापीठ गडचिरोली आणि आता ४)संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठ, अमरावती येथे सुध्दा समाजकार्य विषयाच्या अभ्यासमंडळात सदस्य म्हणून निवड झाली आहे. प्रोफेसर डॉ उमेश वाणी यांच्या या निवडीबद्दल सर्वच स्तरावरून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.