<
जळगाव-(प्रतिनिधी) – पाळधी येथे आज दि. २४ जून 2023, शनिवार रोजी इम्पिरियल इंटरनॅशनल स्कूल, पाळधी येथे शिक्षक पालक सहविचार सभा उत्साहात संपन्न झाली. या सभेला पालकांचा प्रचंड मिळाला. कार्यक्रमाची सुरुवात शाळेचे अध्यक्ष श्री. नरेश चौधरी यांनी द्वीप प्रज्वलन व भारत माता पूजन करुन केली. प्रसंगी शाळेच्या प्राचार्या परविन खान यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक केले.
या प्रास्ताविकात प्राचार्य यांनी मागील शैक्षणिक वर्षाचा अहवाल सादर केला. यात मागील शैक्षणिक वर्षाचा इयत्ता दहावीचा निकाल, MTS, OLYMPID ,इत्यादी सर्व विषयाचे शैक्षणिक अहवाल सादर केले. तसेच शाळेच्या चालू शैक्षणिक वर्षासाठीचे संपूर्ण वर्षा चे नियोजन बाबतीत माहिती दिली.या सभेत पालकांनी देखील शाळेबद्दल विचार मांडून मागील वर्षाच्या शैक्षणिक प्रगती विषयी कौतुक केले. प्रसंगी श्री.जी.डी. पाटील सर यांनी देखील पालकांशी संवाद साधला.प्रसंगी शाळेचे चेअरमन श्री. नरेश चौधरी यांनी पालकांची संवाद साधताना पालकांना सांगितले की विद्यार्थ्यांची काळजी कशी घ्यावी, मुलांना अभ्यास कसा करावा, पालकांची भूमिका काय असावी, विद्यार्थ्यांनी शालेय शिस्तीचे पालन कसे करावे, याबाबत सविस्तर मार्गदर्शन केले. तसेच समाजामध्ये वावरत असताना आपल्या मुलांकडे पालकांनी लक्ष द्यायला हवे,मुलगा मुलगी भेद न करता मुलांची शारीरिक व मानसिक वाढ चांगली होण्यासाठी पालकांनी अधिक लक्ष द्यावे हे सुद्धा सांगितले. त्यानंतर राष्ट्रगीताने ह्या कार्यक्रमाचा समारोप करण्यात आला.