<
लोहारा ता.पाचोरा जी. जळगाव (रिपोर्टर ईश्वर खरे)
लोहारा येथून तालुक्याच्या किंवा जिल्ह्याच्या ठिकाणी आजारी पेशंट घेऊन जाणे येण्यासाठी सध्याला गावात ॲम्बुलन्स नसल्याने खाजगी गाडीने पेशंट येणे जाणे सर्वसामान्य लोकांना परवडेबल नसल्याने नुकतीच गोरगरिबांचे कैवारी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी वैद्यकीय आघाडी जिल्हाप्रमुख डॉ. सागर दादा गरुड यांनी स्वखर्चाने लोहारा गावासाठी ॲम्बुलन्स उपलब्ध करून दिली.
अचानक रात्री अपरात्री पाचोरा किंवा जळगाव आजारी पेशंटला घेऊन जाण्यासाठी गावात ॲम्बुलन्स नसल्याने खाजगी वाहन घेऊन जाणे सर्वसामान्य लोकांना भाडे परवडेबल नसल्याने पेशंटला बाहेरगावी घेऊन जाण फार जिकिरीचे झाले होते. परंतु गावाचे सरपंच अक्षय कुमार जैस्वाल व ग्रा.प. सदस्य व निलेश श्रावण चौधरी, अक्षय देशमुख इ. पदाधिकाऱ्यांनी सामाजिक कार्यकर्ते डॉ.सागर दादा गरुड यांच्याकडे ॲम्बुलन्स ची मागणी करून डॉक्टर सागर दादा गरुड यांनी स्वखर्चाने लोहारे गावासाठी कार्यकर्त्यांच्या मागणी वरून गोरगरिबांसाठी ॲम्बुलन्स उपलब्ध करून दिली.असून डॉ. सागर दादा गरुड यांचे सर्वत्र कौतुक होत आहे. यावेळी निलेश चौधरी, राजू चौधरी ,नाना चौधरी, राजू धोबी, भोला भोई, गुना आप्पा सरोदे, उमेश चौधरी, गजानन सरोदे, पोपट धोबी, पप्पू सोनार, उपसरपंच आबा चौधरी, इ. हजर होते .ॲम्बुलन्स साठी संपर्क निलेश श्रावण चौधरी ,अक्षय रमेश देशमुख, ईश्वर बाबुराव खरे, राजू चौधरी यांच्याशी संपर्क करावा.