<
चोपडा-(प्रतिनिधी) – येथे हेड हेल्ड हाय फाउंडेशन व यु एन विमेन यांच्या संयुक्त विद्यमानाने सुरू असलेल्या जी इ टी सामान्य उद्योजकता प्रशिक्षणाचा ग्रॅज्युएशन सेरेमनी कार्यक्रम उत्साहात पार पाडण्यात आला. या कार्यक्रम अंतर्गत 18 ते 35 वयोगटातील महिलांना उद्योजक प्रशिक्षण देण्यात आले व हे प्रशिक्षण जन शिक्षण संस्थेच्या सहाय्याने पूर्ण करण्यात आले आहे.
सदर कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून शगुना गहीलोटे प्रोग्राम अनालिस्ट, यु एन वुमेन, माननीय अमित कुमार सर जनरल मॅनेजर, हेड हेल्ड हाय फाउंडेशन, माननीय निनाद वाडकर जनरल मॅनेजर डोनर मॅनेजमेंट, हेड हेल्ड हाय फाउंडेशन, हिना भुजाडे प्रोग्राम मॅनेजर हेड हेल्ड हाय फाउंडेशन, नितीन बावस्कर संचालक सिग्मा सेवन कम्प्युटर चोपडा माननीय स्मिता ट्रेनर जन शिक्षण संस्था चोपडा उपस्थित होते सर्व पाहुण्यांनी उद्योजक महिलांना मार्गदर्शन केले व प्रमाणपत्र वितरित केले या शुभप्रसंगी जुन्या व नवीन बॅचमधील महिलांनी आपले कार्यक्रमाविषयी मनोगत व्यक्त केले.
हेड हेल्ड हाय फाउंडेशन, जन शिक्षण संस्था आणि यु एन विमेन यांचे आभार व्यक्त केले.