<
जळगांव-(प्रतिनिधी) – परिसरातील गरीब वंचित विद्यार्थ्यांच्या शिक्षणासाठी सुधर्मा संस्था गेल्या कित्येक वर्षांपासून जाणीवपूर्वक प्रयत्न करत आहे.या वर्षी १०वी,१२वी ११वी उत्तीर्ण झालेल्या सुमारे ४० विद्यार्थ्यांच्या गुणगौरवाचा कार्यक्रम नुकताच “भाऊंचे उद्यान”येथे सपन्न झाला.या वेळी मन्यारखेडा ,खेडी,सावरखेडा, नशिराबाद,
बांभोरी, समतानगर, राजीव गांधीनगर येथील मुला मुलींचा समावेश होता.कार्यक्रमा
चे प्रमुख पाहुणे म्हणून जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे सचिव व न्यायाधीश श्री.एस्.
पी.सय्यद ,कोर्ट व्यवस्थापक जगदीश माळी,
अधिक्षक सुभाष पाटील, न्यायालयीन
सहाय्यक अधीक्षक श्री.योगेश चोरमारे हजर
होते.या सर्वांचे स्वागत सुधर्माच्या वतीने अध्यक्ष श्री.हेमंत बेलसरे, श्री.सूर्यकांत हिवरकर,सौ.सुनिता बेलसरे , राहुल सोनवणे यांनी आंब्याचे रोप देऊन केला.
आपल्या प्रास्ताविकात सुधर्माचे अध्यक्ष श्री.हेमंत बेलसरे यांनी सर्व मुलांना आपल्याला जर गरिबीवर मात करावयाची असेल तर शिक्षणाशिवाय पर्याय नाही.सुधर्मा तुमचे स्वप्न पुर्ण करायला कटिबद्ध आहे.आज आपल्या मनातील प्रश्न,शंकांचे समाधान श्री.सय्यद साहेब करतील,आपण त्यांचेशी संवाद करा असे सांगितले. प्रमुख पाहुणे श्री.
सय्यद सर यांनी सर्व विद्यार्थ्यांशी मनमोकळा संवाद साधला.आपण स्वत: एक गरीब शेतकरी कुटुंबातून आलो असून शाळेसाठी एकच गणवेश वापरावा लागला व शेतात काम करुन मी देखील शिक्षण घेतले.आपले ध्येय निश्चित करा,त्यासाठी प्रयत्न करा,हार मानू नका, विचलित किंवा निराश न होता अभ्यास करा.ससा आणि कासवाच्या गोष्टीची आठवण ठेवा.सतत प्रयत्न करणारे
कासव शेवटी जिंकतेच हे विसरू नका असे प्रेरणादायी प्रबोधन करुन सुधर्माच्या कार्याचे
जेवढे कौतुक कराल तेव्हढे कमीच आहे.
असेच पुढील कार्यासाठी आमच्या शुभेच्छा
कायमच आपणासोबत राहतील असे सांगितले.यावेळी भाईदास बागले तसेच राणी योगेश जखोटे राहणार मन्यारखेडा या लांबच्या अंतरावरील शाळेत पायी जाणाऱ्या
विद्यार्थ्यांना दोन सायकली देण्यात आल्या.
याशिवाय उपस्थित सर्व मुलांना मोठे रजिस्टर,पेन,दप्तर आणि पेढ्यांचा बॉक्स वाटण्यात आला. कार्यक्रम यशस्वीतेसाठी श्री.सूर्यकांत
हिवरकर,प्रियंका पवार,सुवर्णा मराठे,तुषार
तायडे,शुभम हातगळे, गायत्री पाटील यांनी
सहकार्य केले.शेवटी आभार सौ.सुनिता बेलसरे यांनी मानले.