<
लोहारा ता.पाचोरा जी.जळगाव (रिपोर्टर ईश्वर खरे)
आज घडीला लोहारा ते शेंदुर्णी जाण्यायेण्यासाठी शासन स्तरावर जी.आर.असतानाही अपंग व्यक्ती जेष्ठ नागरिक व शालेय विद्यार्थी योजनेपासून वंचित असून शासनाच्या अनेक योजनांचा लाभ शासन स्तरावरून लाभार्थ्यांपर्यंत पोहोचवण्याचे काम सुरू आहेत.कोणती योजना असली तरी लाभार्थी त्यापासून वंचित राहणार नाही, दक्षता शासनाकडून घेतली जाते लोहारा येथील जवळपास 100 महाविद्यालयीन शालेय विद्यार्थी विद्यार्थिनी व अन्य महिला सुधारक शेंदुर्णी येथे जातात पण मार्गावर व सेवा नसल्याने वंचित आहेत अनेक वेळा संघटना संस्था व जेष्ठ नागरिक संघ या कडून मार्गावर बस सेवा सुरू करा अशी मागणी यापूर्वी केली आहे असे असताना संबंधित परिवहन महामंडळाच्या अधिकाऱ्यांकडून एक प्रकारे दखल घेतली जात नाही. शासनाचे परिपत्रक असताना तेही अंमलबजावणी होत नसल्याने तरुण सामाजिक कार्यकर्ते निलेश रावण चौधरी व युवराज पाटील ज्येष्ठ नागरिक अपंग बांधव व शालेय विद्यार्थी यांनी राप महामंडळाचे जिल्हा व्यवस्थापक यांना निवेदनाद्वारे मागणी केली आहे.
निवेदनात नमूद असे की खास करून शेंदुर्णी जाणाऱ्या शालेय विद्यार्थी विद्यार्थिनी यांना जाण्या येण्यासाठी सुरू करा व लोहारा येथून जळगाव जाण्याची एकेरी बस फेरी आहे नंतर एकही बस येत नाही. ती सुद्धा सवलतदारक महिला ज्येष्ठ नागरिक दिव्यांग यासाठी सुरू करा अन्यथा आठ दिवसात रस्ता रोको करण्यास ज्येष्ठ नागरिक संघ अपंग लाभार्थी व शालेय विद्यार्थ्यांनीअसा खणखणीत इशारा निवेदनात देण्यात आला आहे.