<
जळगाव-(प्रतिनिधी) – मनपाचे तत्कालीन नगरसेवक तसेच जजि मविप्र चे मा. अध्यक्ष स्व.नरेंद्रअण्णा यांच्या ५ व्या स्मृतिदिनानिमित्त सालाबादप्रमाणे भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते या शिबिराप्रसंगी ९० रक्तपेशव्यांचे यशस्वी संकलन करण्यात आले. तसेच आजतागायत ऐनवेळी रक्त लागलेल्या गोरगरीब गरजवंत एक हजाराहून अधिक रुग्णांना रक्त मिळवून देण्याचे काम स्व.नरेंद्रअण्णा पाटील प्रतिष्ठान मार्फत ॲड.पियुष नरेंद्रअण्णा पाटील यांच्या नेतृत्वात यशस्वीपणे करण्यात आले आहे. तसेच सदर रक्तदान चळवळ संपूर्ण जळगाव शहर, तालुका, गाव, तांडा, वस्तीपर्यंत नेत मी रक्तदाता नोंदणी अभियान च्या माध्यमातून जनजागृती करत मोठ्या प्रमाणावर काम करायचे आहे व रक्तदान चळवळ घराघरात पोहोचवायचे आहे असे मत स्व.नरेंद्रअण्णा पाटील प्रतिष्ठानचे अध्यक्ष पियुष पाटील यांनी मांडली. या वेळी सर्वपक्षीय पदाधिकारी सामाजिक कार्यकर्त्यांची विशेष उपस्थिती होती.
जळगाव शहराच्या प्रथम नागरिक महापौर सौ.जयश्रीताई महाजन जळगाव शहराचे आमदार मा.राजू मामा भोळे यांच्यासह शहरातील विविध सामाजिक राजकीय सर्वपक्षीय नेते मंडळींसह पदाधिकारी सामाजिक कार्यकर्त्यांचे विशेष उपस्थिती दिसून आली.
तसेच जजि मविप्र सभासदांची उपस्थिती.
सदर कार्यक्रमाप्रसंगी जजि मविप्र सभासदांची देखील विशेष उपस्थिती बघायला मिळाली.