<
लोहारा ता. पाचोरा जि.जळगाव (रिपोर्टर ईश्वर खरे)
धी शेंदुर्णी सेंक एज्यु को-ऑप सोसा द्वारा संचलित डॉ जे जी पंडित माध्यमिक विद्यालय लोहारा ता पाचोरा विद्यालयात मुख्याध्यापक आर एस परदेशी यांचा सेवापूर्ती सन्मान सोहळा व नूतन सभागृहाचे उद्घाटनाचा कार्यक्रम दि 28 जुलै 2023 वार शुक्रवार रोजी संपन्न झाला मुख्याध्यापक परदेशी सर हे सोमवार दिनांक 31 7 2023 रोजी नियत वयोमानानुसार सेवानिवृत्त होत आहेत त्यांच्या 31 वर्षांच्या प्रदीर्घ सेवेचा सेवापुर्ती सन्मान सोहळा या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शेंदुर्णी शिक्षण संस्थेचे जेष्ठ संचालक व स्थानिक समिती अध्यक्ष भीमराव शामराव शेळके होते प्रमुख अतिथी म्हणून संस्थेचे सचिव सतीश चंद्र काशीद महिला संचलिका उज्वला सतीश काशीद जेष्ठ संचालक सागरमलजी जैन कृषीरत्न विश्वासराव शेळके सरपंच अक्षय जैस्वाल सोसायटी चेअरमन सुनील क्षीरसागर वसतिगृह सचिव कैलास देशमुख होते प्रथम अध्यक्ष व प्रमुख अतिथी मान्यवर यांचे स्वागत ईशस्तवन व स्वागत गीताने करण्यात आले त्यानंतर मान्यवरांच्या हस्ते प्रतिमा पूजन करून अध्यक्ष व प्रमुख अतिथीआलेले सर्व मान्यवरांचे स्वागत विद्यालयातर्फे शाल टोपी व पुष्पगुच्छ देऊन करण्यात आले कार्यक्रमाचे प्रास्ताविक उपमुख्याध्यापक एस टी चिंचोले यांनी केले अध्यक्ष व प्रमुख उपस्थित अतिथी व सर्व मान्यवरांच्या हस्ते नूतन सभागृहाचे उद्घाटन करण्यात आले नूतन सभागृहास देणगी देणारे सुनील नामदेव पाटील डॉ राहुल पंडित सुरेश किसन चौधरी राजेंद्र गीते व सहकारी आनंदा यादव सरोदे विश्वनाथ बोरसे व सहकारी सौ प्रतिभा जाधव या सर्वांचे सत्कार विद्यालय व संस्थेमार्फत अध्यक्ष व प्रमुख अतिथी मुख्याध्यापक उपमुख्याध्यापक पर्यवेक्षिका यांच्या हस्ते शाल टोपी पुष्पहार देऊन करण्यात आले यानंतर सेवापूर्ती सन्मान सोहळा मुख्याध्यापक आर एस परदेशी यांचा सपत्नीक सत्कार संस्थेचे सचिव सतीश चंद्र काशीद व संस्थेच्या महिला संचालिका उज्वला सतीश काशीद यांच्या हस्ते शाल श्रीफळ टोपी पुष्पहार देऊन करण्यात आले विद्यालयातर्फे उपमुख्यद्यापक पर्यवेक्षिका मॅडम व सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी मार्फत भेटवस्तू कपडे साडी पुष्पहार देऊन करण्यात आले विद्यार्थी मनोगत प्रथमेश सुर्वे कु प्रांजल पालीवाल यांनी केले शिक्षक मनोगत बी एन पाटील प्रमुख मान्यवरांमधून संस्थेचे सचिव सतीश काशीद प्रा अतुल सूर्यवंशी विश्वासराव शेळके अमृत चौधरी डॉ विकास पालीवाल तुषार परदेशी यांनी आपल्या मनोगतातून मुख्याध्यापक परदेशी सर यांच्या कार्यकर्तृत्वावर व सेवा काळातील अनुभवांवर विचार मांडले.
सत्काराला उत्तर मुख्याध्यापक आर एस परदेशी यांनी दिले अध्यक्षीय मनोगतातून आबासाहेबांनी परदेशी सरांनी याच शाळेत नोकरीला सुरुवात केली व शेवटही या शाळेत होतो आहे याचा आनंद असून शाळेच्या गुणवत्ता वाढीसाठी व विकासासाठी केलेल्या त्यांच्या कार्याची ओळख करून दिली सरांचा सत्कार सरपंच व सर्व सदस्य सोसायटी चेअरमन व सर्व सदस्य स्थानिक समिती सदस्य ज्येष्ठ नागरिक अध्यक्ष सर्व पत्रकार बंधु व सदस्य माजी विद्यार्थी गावातील परिसरातील विविध अधिकारी पदाधिकारी विविध शाळांचे मुख्याध्यापक व नागरिकांनी नातेवाईक मंडळींनी शाल टोपी श्रीफळ पुष्पगुच्छ देऊन केले. कार्यक्रमास मोठ्या संख्येने सरांवर प्रेम करणारे मित्र आप्तेष्ट नातेवाईक मंडळी उपस्थित होते यामध्ये विद्यालयाचे माजी मुख्याध्यापक अ अ पटेल एस आर माने डब्ल्यू एस पाटील जैन सर प्राध्यापक अतुल सूर्यवंशी एस पी उदार अमरीश गरुड रमेश राजपूत विवेक जाधव प्रकाश नामदेव पाटील डॉ बाळू जैन शरद अण्णा भडके साहेब विकास देशमुख ईश्वर देशमुख अमृत चौधरी नंदू सुर्वे उमेश देशमुख भगवान खरे उपसरपंच आबा चौधरी राजेंद्र हरी पाटील देणगीदार सुनील नामदेव पाटील सौ भारती पाटील डॉक्टर राहुल पंडित सुरेश किसन पाटील राजेंद्र गीते प्रतिभा जाधव कैलास सरोदे विश्वनाथ बोरसे पत्रकार कृष्णा आप्पा महेंद्र आप्पा रमेश आप्पा दिनेश चौधरी चंदू खरे दीपक पवार चंद्रकांत पाटील नाना राजपूत दिलीप चौधरी आबा चौधरी गजानन क्षीरसागर उपमुख्याध्यापक एस टी चिंचोले पर्यवेक्षिका यु डी शेळके सर्व शिक्षक शिक्षकेतर व वसती गृह कर्मचारी बंधू भगिनी गावातील परिसरातील नागरिक मित्र नातेवाईक मंडळी उपस्थित होते कार्यक्रमाचे सूत्रसंचलन व्ही एम शिरपुरे यांनी केले व आभार यु डी शेळके मॅडम यांनी मानले कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी सर्व शिक्षक शिक्षकेतर वसती गृह कर्मचारी बंधू भगिनी यांनी परिश्रम घेतले कार्यक्रमानंतर भोजनाची व्यवस्था करण्यात आलेली होती.